Next
रोटरीचे व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार
प्रेस रिलीज
Thursday, March 22 | 10:53 AM
15 0 0
Share this story


पुणे : ‘रोटरी क्लब ऑफ पुणे, गांधी भवन’ तर्फे २०१८ या वर्षासाठीचे ‘व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार’ (व्होकेशनल एक्सलेन्स अॅवॉर्ड ) १८ मार्च रोजी प्रदान करण्यात आले. 

अपूर्वा पालकर (शैक्षणिक क्षेत्र), श्यामला वनारसे (मानसशास्त्रज्ञ), मीरा बडवे (दृष्टीहीन प्रज्ञाचक्षू व्यक्तींसाठी सामाजिक काम) यांना  हे पुरस्कार, अतिरिक्त पोलीस आयुक्त रविंद्र सेनगावकर (दक्षिण विभाग) यांच्या हस्ते देण्यात आले. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘रोटरी क्लब ऑफ पुणे, गांधी भवन’चे अध्यक्ष गणेश जाधव होते. प्रांतपाल रवी धोत्रे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच, मनीष धोत्रे (सचिव, ‘रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन’), विदुला भट (निमंत्रक, ‘रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन’), मनीषा सेनगावकर या वेळी उपस्थित होते. 

श्यामला वनारसे यांच्यावतीने सुनंदा रासने यांनी पुरस्कार स्वीकारला. अपूर्वा पालकर, मीरा बडवे यांनी पुरस्काराविषयी आपले मनोगत व्यक्त केले. प्रा. उज्वला बर्वे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link