Next
‘सिग्नेचर जावा’ मोटरसायकल्सचा लिलाव
जमा रक्कम शहिदांच्या मुलांच्या शिक्षणासाठी दान
प्रेस रिलीज
Tuesday, April 02, 2019 | 03:40 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : क्लासिक लिजेंड्स प्रायव्हेट लिमिटेडतर्फे लिलावाच्या माध्यमातून निधी जमा करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विशेष तयार करण्यात आलेल्या सिग्नेचर जावा मोटरसायकल्स ‘फॉरएव्हर हिरोज’ उपक्रमाचा भाग म्हणून लिलावात काढण्यात आल्या. या कार्यक्रमाला भारतीय सशस्त्र दलाचे सहकार्य लाभले. बोलीतून जमा झालेली रक्कम केंद्रीय सैनिक मंडळ, संरक्षण मंत्रालय, भारत सरकार यांच्यातर्फे चालविण्यात येणाऱ्या सशस्त्र दल ध्वज दिन निधीला सुपूर्द केली जाईल. ज्याचा उपयोग देशासाठी स्वत:चे प्राण आणि कुटुंबीय पणाला लावणाऱ्या शहिदांच्या मुलांच्या शिक्षणासाठी करण्यात येणार आहे.  

या उपक्रमाविषयी बोलताना ‘क्लासिक लिजेंड्स’चे सह-संस्थापक आणि फि कॅपिटलचे मनेजिंग पार्टनर अनुपम थरेजा म्हणाले, ‘अलीकडच्या काळात जवानांनी जे साहस दाखवले आहे, त्या सशस्त्र दलातील वीरांना सलाम करण्याची ही अतिशय योग्य वेळ आहे. आज त्यांच्यामुळे देश पुढे चालला आहे. आमचा ‘फॉरएव्हर हिरोज’ उपक्रम म्हणजे जवानांनी बजावलेल्या कामगिरीला वंदन आहे. ही भावना आमच्या नेतृत्व टीमच्या मनात उत्पन्न झाली, सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी सहवेदना व्यक्त केल्या. अनेक लोक सशस्त्र दलाशी निगडीत कुटुंबांतील आहेत.’

‘या उपक्रमाला ग्राहकांनी जो भरभरून प्रतिसाद दिला, त्यामुळे आमचे मन भरून आले. हे वैशिष्ट्य जावा रायडर आणि संपूर्ण मोटरसायकल कम्युनिटीला साजेसे आहे. ग्राहकांमध्ये ही वृत्ती असल्याने आम्ही मोटरसायकल डिलिव्हरी थोडी पुढे ढकलली होती आणि ३० मार्च २०१९पासून जावा मोटरसायकलची डिलिव्हरी सुरू करत आहोत, ही घोषणा करताना आनंद वाटतो,’ असे थरेजा यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search