Next
‘आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’चा वर्धापनदिन साजरा
प्रेस रिलीज
Friday, March 09, 2018 | 05:52 PM
15 0 0
Share this story पुणे: ‘आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’चा चोविसावा वर्धापनदिन नुकताच त्यांच्या दिघी कॅम्पसमध्ये साजरा झाला. या वेळी पर्सिस्टंट टेक्नॉलॉजीचे संस्थापक अध्यक्ष आनंद देशपांडे, एआयटीचे अध्यक्ष मेजर जनरल जलज भोला उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ‘द चीफ ऑफ आर्मी स्टाफ ट्रॉफी’  शिवम सिंग यांना आणि ‘जीओसी –इन-सी सदर्न कमांड ट्रॉफी फोर बेस्ट गर्ल स्टुडंट’  कीर्ती कुशवाहा यांना प्रदान करण्यात आली.

या वर्षीचा ‘लाइफटाइम अचिव्हमेंट अवार्ड’ झेडएफ स्टीयरिंग गियर (इंडिया) लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश मुनोत यांना देण्यात आला. ऑटोमोटिव्ह उद्योगातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व , के. बुव्हेत इंजिनीअरिंग लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक सुशील चंद्रा यांना ‘सक्सेसफुल आंत्रप्रेन्यूअर’ म्हणून सन्मानित करण्यात आले.

एआयटीचे संचालक ब्रि. अभय भट (निवृत्त) यांनी श्रोत्यांना एआयटीच्या शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रात आणि इतर क्षेत्रातल्या कामगिरीविषयी माहिती दिली.

आनंद देशपांडे यांनी  आपल्या भाषणात यशाची  पंचसूत्री सांगितली. ते म्हणाले, ‘मोठी स्वप्ने पहा, प्रत्येक पाऊल एकाग्रतेने आणि मनापासून उचला, तुमच्याभोवती जनसंपर्काचे जाळे उभारा, पूर्णपणे ताबा ठेवणारी उद्योजकाची विचारसरणी आचरणात आणा आणि जिंकेपर्यंत प्रयत्न सोडू नका.’

मेजर जनरल जलज भोला यांनी त्यांच्या भाषणात सदाचरण, समयसूचकता आणि असलेली स्थिती बदलण्याचा दृष्टिकोन अधोरेखित केला. हाती घेतलेल्या मोहिमेचा संपूर्ण ताबा आणि जबाबदारी घेण्याविषयीही त्यांनी आग्रही सूचना केल्या.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link