Next
पुण्यात १४ डिसेंबरला ‘नृत्यसंध्या’चे आयोजन
प्रेस रिलीज
Monday, December 10 | 03:51 PM
15 0 0
Share this story

पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या वतीने सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत ‘नृत्यसंध्या’ या ओडिसी नृत्य कार्यक्रमाचे आयोजन १४ डिसेंबर २०१८ रोजी करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सरदार नातू सभागृहात सायंकाळी सहा वाजता होईल,’ अशी माहिती भारतीय विद्या भवनचे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे यांनी दिली.

आकांक्षा ओडिसी नृत्यालयाच्या संस्थापक रसिका गुमास्ते, त्यांच्या शिष्या आणि शुभदा वारदेकर यांच्या शिष्या शमा अधिकारी हा कार्यक्रम सादर करणार आहेत. भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमातील हा ६४ वा कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम विनामूल्य असून, सर्वांसाठी खुला आहे.

कार्यक्रमाविषयी :
दिवस :
शुक्रवार, १४ डिसेंबर २०१८
वेळ : सायंकाळी सहा वाजता
दिवस : सरदार नातू सभागृह, भारतीय विद्या भवन, सेनापती बापट रस्ता, पुणे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link