Next
‘अॅप्टेक’चे पुण्यात कार्यक्षेत्र वाढविण्याचे नियोजन
प्रेस रिलीज
Saturday, May 19, 2018 | 12:00 PM
15 0 0
Share this article:

प्रवीर अरोरापुणे : जगभरातील तब्बल ४० देशांमध्ये शिक्षण व प्रशिक्षण केंद्रांचे जाळे असणारी अॅप्टेक लिमिटेड ही कंपनी भारतात, विशेषतः पुण्यात आपले पाय घट्ट रोवण्याचे नियोजन करीत आहे. पुण्यात कर्मचाऱ्यांची व विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यांना आपापल्या क्षेत्रात, करिअरमध्ये प्रगती साध्य करायची असल्याने, नवी कौशल्ये आत्मसात करणे व असलेली कौशल्ये वाढवणे यांत त्यांना जास्त रस असल्याने यात त्यांना ‘अॅप्टेक’ची मदत होणार आहे.

देशातील अनेक नामवंत व प्रख्यात शिक्षण संस्था पुण्यात आहेत. पुण्याला विद्येचे माहेरघर म्हटले जाते. विद्यार्थ्यांची खूप मोठी संख्या या शहरात आहे. गेल्या काही काळात पुण्यात आयटी कंपन्या, तसेच तांत्रिक सेवा देणाऱ्या कंपन्या सुरू झाल्या. या कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी देशभरातील तरुण या शहरात दाखल झाले. विद्यार्थी व आयटी नोकरदार यांना त्यांच्याकडील मूळ पदवीबरोबर नव्या युगाचे तंत्रज्ञान व कौशल्ये आत्मसात करण्याची गरज निर्माण होत असते. हे प्रशिक्षण त्यांना देण्यासाठी नव्या स्वरूपाच्या संस्था उभ्या राहणे हे पाठोपाठ आलेच. तंत्रज्ञान व तांत्रिक कौशल्ये या काळाबरोबर सतत बदलत असणाऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळे या प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांकडील विद्यार्थ्यांचा ओघ सतत वाढतच राहत आहे.

‘अॅप्टेक’मध्ये या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी सज्ज राहण्यास तयार केले जाते. तांत्रिकदृष्ट्या सज्ज असणाऱ्या व कोणत्याही स्वरूपाच्या नोकरीत पटकन सामावून घेतल्या जाणाऱ्या तरुणांना आयटी व इतर उद्योगांमध्ये मोठीच मागणी असते. त्यामुळे नोकरी मिळण्यास सुसज्ज करून देणे (एम्प्लॉयमेंट ड्रिव्हन एनरोलमेंट) हे धोरण ठेवून ‘अॅप्टेक’ने काम सुरू केले.

‘अॅप्टेक’चे समूह मुख्य विपणन अधिकारी प्रवीर अरोरा म्हणाले की, ‘अॅप्टेकमधून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळण्याचे प्रमाण जास्त आहे, हे आम्ही दाखवून दिले आहे. पुण्यात आमची १५ केंद्रे आहेत व त्यांमध्ये दोन हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आम्ही आणखी विस्तार करण्याचे नियोजन केले आहे. वेगवेगळ्या उद्योगांमध्ये सामावून घेतला जाणारा तरुण वर्ग निर्माण करण्यासाठी तशा स्वरूपाचे प्रशिक्षण नव्या केंद्रांमध्ये आम्ही देणार आहोत. कौशल्ये वाढवणे व नोकऱ्यांसाठी मनुष्यबळ निर्माण करणे हे आमचे विधायक काम आम्ही यापुढेही जोमात करणार आहोत.’

श्रुतीधर पालीवालसंगणक प्रशिक्षण देणारी संस्था म्हणून ‘अॅप्टेक’ने कारभार सुरू केला होता. गेल्या काही वर्षांमध्ये या संस्थेने प्रशिक्षणाच्या स्वरूपात कालानुरूप बदल केले व ते अधिक कौशल्ये देणारे बनविले. अॅनिमेशन, व्हीएफएक्स, इंग्रजी भाषेचे प्रशिक्षण, एव्हिएशन, रिटेल, हॉस्पिटॅलिटी, ट्रॅव्हल व टुरिझम, बॅंकिंग व फायनान्स अशा अनेक क्षेत्रांमध्ये आवश्यक असणारे शिक्षण ‘अॅप्टेक’मध्ये सध्या दिले जाते. ऑनलाईन परिक्षा व मूल्यांकन चाचण्या घेणारी अॅप्टेक ही एक आघाडीची संस्था आहे.

‘अॅप्टेक’विषयी :

शिक्षण व प्रशिक्षण देण्याच्या व्यवसायात ‘अॅप्टेक’ गेली तीस वर्षे कार्यरत आहे. १९८६मध्ये ही कंपनी सुरू झाल्यापासून आणि सध्या देशभर सुरू असलेल्या एक हजार ३००केंद्रामधून ‘अॅप्टेक’ने ‘आयटी’पासून व्यक्तिगत विकासापर्यंतच्या १० विविध स्वरूपाच्या व्यवसायांमध्ये प्रभावी काम केले आहे. सुमारे ४० देशांमध्ये ‘अॅप्टेक’चे अस्तित्व आहे. व्यक्तिगत व व्यावसायिक प्रशिक्षण या दोन कार्यक्षेत्रांच्या माध्यमातून ७० लाख विद्यार्थ्यांना या संस्थेने घडवले आहे.

व्यक्तिगत प्रशिक्षणामध्ये करिअर व व्यावसायिक प्रशिक्षण ‘अॅप्टेक’ देऊ करते. अॅप्टेक काँप्युटर एज्युकेशन, अॅरेना अॅनिमेशन आणि माया अॅकॅडमी ऑफ अॅडव्हान्स्ड सिनेमॅटिक्स (अॅनिमेशन व मल्टीमिडीया), ‘अॅप्टेक’द्वारे चालविली जाणारी लॅक्मे अॅकॅडमी, अॅप्टेक बॅंकिंग अॅंड फायनान्स अॅकेडमी, अॅप्टेक हार्डवेअर अॅंड नेटवर्किंग अॅकेडमी, अॅप्टेक एव्हिएशन अॅंड हॉस्पिटॅलिटी अॅकॅडमी, अॅप्टेक इंग्लिश लर्निंग अॅकॅडमी याचबरोबर नुकतेच चालू केलेले मोंटाला इंटरनॅशनल प्री-स्कूल यांचा समावेश व्यक्तिगत प्रशिक्षण देण्यात होतो. व्यावसायिक प्रशिक्षणाच्या उपक्रमात कंटेंट डेव्हलपमेंट (अॅप्टेक लर्निंग सर्व्हिसेस), कॉर्पोरेट अधिकारी व संस्था यांचे प्रशिक्षण व मूल्यांकन (अॅप्टेक ट्रेनिंग सोल्युशन्स, अॅप्टेक अॅसेसमेंट अॅन्ड टेस्टिंग सोल्युशन्स) या संस्था कार्यरत आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search