Next
निंभोरकरांकडून ‘सर्जिकल स्ट्राइक’विषयी ऐकण्याची पुणेकरांना संधी
शिवसमर्थ प्रतिष्ठानतर्फे शिवजयंती सोहळ्यानिमित्त विशेष कार्यक्रम
प्रेस रिलीज
Wednesday, March 20, 2019 | 05:38 PM
15 0 0
Share this article:

संग्रहित फोटो

पुणे : ‘शिवसमर्थ प्रतिष्ठान, मृत्युंजय अमावस्या मंच आणि विवेक व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती महोत्सव आयोजित केला असून, या वेळी उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचे ब्रेन म्हणून ओळखले जाणारे लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांना प्रत्यक्ष ऐकण्याची संधी पुणेकरांना लाभणार आहे. या कार्यक्रमात राजेंद्र निभोरकर ‘उरी ते बालाकोट- सर्जिकल स्ट्राइक ते एअर स्ट्राइक’ या विषयावर ते व्याख्यान देणार आहेत,’ अशी माहिती शिवसमर्थ प्रतिष्ठानचे संस्थापक दीपक नागपुरे यांनी दिली.

हा कार्यक्रम २४ मार्च २०१९ रोजी सायंकाळी सात वाजता सनसिटी जवळील भाजी मंडई रोड येथे हा होणार आहे. उरी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकमध्ये लेफ्टनंट जनरल निंभोरकर यांची महत्त्वाची भूमिका होती. तमाम भारतीयांसाठी अभिमानाची बाब ठरलेल्या या घटनेचे महत्त्वाचे पैलू, आखलेली रणनिती याबद्दल थेट निंभोरकर यांच्याकडून ऐकायला मिळणारे व्याख्यान सर्वांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे.

राजेंद्र निंभोरकरत्याचबरोर मुख्य कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी भारतीय हवाई दलातील धाडसी अधिकारी अभिनंदन वर्धमान यांच्या शौर्याला अनोख्या पद्धतीने सलामी दिली जाणार आहे. प्रसिद्ध मूर्तिकार अजिंक्य कुलकर्णी हे सायंकाळी सहा वाजता कार्यक्रमाच्या प्रवेशद्वारावर अभिनंदन यांचा मातीचा पुतळा घडविण्याचे कार्य ‘लाइव्ह’ करणार आहेत. हेदेखील या कार्यक्रमाचे एक प्रमुख आकर्षण असेल.

हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, देशाच्या रक्षणासाठी सीमेवर लढणाऱ्या प्रत्येक जवानाला प्रोत्साहन देण्यासाठी या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन नागपुरे यांनी केले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Madan Latkar About 92 Days ago
Great work I will attend
0
0

Select Language
Share Link
 
Search