Next
मंजुश्री ओक यांचा विक्रम; १२२ भाषांमधील गाण्यांचे १३ तास सादरीकरण
गिनिज बुकमध्ये नोंद होण्यासाठी प्रयत्न
BOI
Friday, October 11, 2019 | 03:23 PM
15 0 0
Share this article:

मंजुश्री ओक

पुणे : भारतीय भाषांची समृद्धी जगासमोर मांडण्यासाठी पुण्यातील गायिका मंजुश्री ओक यांनी १२२ भारतीय भाषांमधील गाणी सलग १३ तासांच्या कार्यक्रमात सादर केली. १० ऑक्टोबर रोजी झालेल्या या अनोख्या विक्रमाची नोंद ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’मध्ये होण्याची शक्यता आहे. 

‘अमृतवाणी’ या नावाने सादर झालेल्या या अनोख्या कार्यक्रमाची दखल ‘गिनिज’मध्ये घेतली जाण्यासाठीच्या सर्व अटी मंजुश्री ओक यांनी या कार्यक्रमात पूर्ण केल्या असून, आता ‘गिनिज’कडून हा विक्रम जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे. यापूर्वी एकाच कार्यक्रमात ७६ भाषांमधील गाणी गाण्याचा विक्रम नोंदला गेला असून, सलग १३ तासांत १२२ भारतीय भाषांमधील गाणी सादर करण्याचा हा पहिलाच जागतिक विक्रम ठरेल.

श्री यशलक्ष्मी आर्ट आणि मंजुश्री ओक यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला आदिवासी विकास आणि संशोधन संस्था, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, ललित कला केंद्र, हेरिटेज द आर्ट लेगसी आणि जनगणना कार्यालय यांचे सहकार्य लाभले होते. पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सकाळी साडेदहा ते रात्री साडेअकरा या वेळेत हा कार्यक्रम झाला.


या कार्यक्रमात सादर होणाऱ्या गीतांची निवड काळजीपूर्वक करण्यात आली होती. भारतात बोलल्या जाणाऱ्या ७८० भाषांपैकी अनुसूचित (शेड्युल्ड) असलेल्या २२ भाषा, नॉन शेड्युल्ड प्रकारच्या ३४ भाषा, तसेच उपभाषा, बोलीभाषा व मातृभाषा प्रकारातील ६४ भाषांमधील गीते या कार्यक्रमासाठी निवडण्यात आली होती. महाराष्ट्रातील आदिवासी भाषांमधील काही नवीन गाण्यांचाही अंतर्भाव करण्यात आला होता. ईशान्य भारतातील दुर्लक्षित ४१ भाषा, तसेच काश्मीरमधील व अगदी निकोबारी भाषेचाही यात समावेश होता. पारंपरिक गीते, लोकगीते, भक्तिगीते, अभंग, देशभक्तिपर गीते, भावगीते, लावणी अशा विविध प्रकारांतील गीतांची निवड करण्यात आली होती. ही सर्व गीते वाद्यवृंदाच्या साथीने गायली गेली.    

मंजुश्री ओक यांनी यापूर्वी २०१७ आणि २०१८ अशी सलग दोन वर्षे ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्’ आणि ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्डस्’मध्ये दोन वेगळे विक्रम नोंदविले आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Anil kulkarni About 6 Days ago
Where can I listen and see the the post.
0
0

Select Language
Share Link
 
Search