Next
‘फिनोलेक्स’, ‘मुकुल माधव’तर्फे वारकऱ्यांची सेवा
प्रेस रिलीज
Tuesday, July 24 | 04:30 PM
15 0 0
Share this story



पुणे : टाळ-मृदूंगाच्या गजरात, माऊली-माऊलीच्या जयघोषात करीत आळंदीहून निघालेला वैष्णवांचा मेळा आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरात पोहोचला. या वारीमार्गावर फिनोलेक्स पाइप्स व मुकुल माधव फाउंडेशनतर्फे २३ ठिकाणी वारकऱ्यांची सेवा करण्यात आली.

देहू-आळंदी-पंढरपूर मार्गावर चालणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज पालखीबरोबर चालणाऱ्या वारकऱ्यांसह राज्यातील इतर पालख्यांतील वारकऱ्यांची सेवा संस्थेतर्फे करण्यात आली. फिनोलेक्स पाइप्सतर्फे दणकट पिशव्या, टोप्या, राजगिरा लाडू, चिक्की व फराळाच्या चिवड्याचे वाटप २३ ठिकाणी करण्यात आले.

मुकुल माधव फाउंडेशनतर्फे ११ ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी आणि उपचार शिबिर घेण्यात आले. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगतगुरु तुकाराम महाराज, संत सोपानकाका, संत निवृत्तीनाथ महाराज, श्री गजानन महाराज या पालखी मार्गावर ही सेवा पुरविण्यात आली. पुण्यात दिघी, निगडी, उरळीकांचन, सासवड, इंदापूर, बारामती, नीरा आणि इतर अशा एकूण २३ ठिकाणी जवळपास एक लाखापेक्षा अधिक लाडूचे, चिक्कीचे पाकीट वाटण्यात आले.

फिनोलेक्स पाइप्समधील कर्मचारी, पदाधिकारी, त्या त्या भागातील वितरक व ससून सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमने मनोभावे वारकऱ्यांची सेवा केली. फिनोलेक्स पाइप्सचे चेअरमन प्रकाश छाब्रिया आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या संस्थापिका रितू छाब्रिया यांच्या संकल्पनेतून गेली ३० वर्षे हा उपक्रम चालू आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही वारकऱ्यांची सेवा करता आली, याचे समाधान वाटत असल्याचे छाब्रिया दाम्पत्याने सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link