Next
‘ट्रम्फ’तर्फे ‘टायगर १२०० एक्ससीएक्स’ सादर
प्रेस रिलीज
Saturday, May 12, 2018 | 12:45 PM
15 0 0
Share this article:

नवी दिल्ली : ट्रम्फ मोटरसायकल इंडिया या कंपनीने नव्याकोर्‍या ‘टायगर १२०० एक्ससीएक्स’ बाइकचे बाजारात अनावरण केले. आजवरच्या टायगर मॉडेल्समधील नवीन ‘टायगर १२०० एक्ससीएक्स’ हे अत्याधुनिक मॉडेल आहे.

गेल्या ८० वर्षांपासून चालत आलेल्या या ब्रॅंडच्या परंपरेत आता नव्याने समाविष्ट झालेली ही बाइक म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण उत्पादन असून ऑफ रोड आव्हाने स्वीकारण्यासोबतच शहरी रस्त्यांवरही लीलया कामगिरी करण्यासाठी हे उत्पादन तयार करण्यात आले आहे. यातील प्रत्येक फिचरमध्ये नवीन तंत्रज्ञानाचे संशोधन समाविष्ट झाले असून, इंजिनाच्या आधुनिकीकरणासोबतच प्रिमीयम वैशिष्ट्ये आणि परफेक्ट राइडचा अनुभव मिळावा यासाठी याची स्टाइलही अपडेट करण्यात आली आहे.

ट्रम्फ मोटरसायकल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक विमल संबळी म्हणाले, ‘या कॅटेगरीतील बाइक्सचे सर्वप्रथमच इतकी वैशिष्ट्ये असलेली ‘टायगर १२००’ सिरीज अत्याधुनिक फिचर्स आणि चालकाभिमुख तंत्रज्ञानाने नटलेली असून, ऑफ-रोड रायडिंगसाठी अद्वितीय स्थैर्य आणि नियंत्रणासह ही परफेक्ट गाडी आहे. चालकांना त्यांचे नियोजित धाडस आत्मविश्वासाने पूर्ण करण्यासाठी ही बाइक प्रेरणादायी ठरत असून, जगात कुठेही कितीही वेळ भटकण्यासाठी ही उत्तम आहे. दररोजचा प्रवास असो वा कठीण रस्त्यांवरील धाडसी रायडिंग, ही बाइक चालकाला पूर्णतः साथ देते. या विकासामुळे ‘टायगर’च्या टिकाऊपणावर शिक्कामोर्तब झाले असून, यातील सोप्या रायडिंग स्टाइल आणि टायगर पॉइजमुळे नवीन १२०० मॉडेल हे कमाल धाडस आणि डॉमिनन्ससाठीच तयार केले गेले आहे, असा विश्वास निर्माण होतो.’

‘नवीन ‘टायगर १२००’ने पूर्णतः विकसित होण्यासाठी पूर्ण चार वर्षे घेतली, म्हणूनच ती अत्याधुनिक झाली आहे. आज पूर्णतः क्लास-लिडिंग इंजिन वैशिष्ट्ये, रायडर फोकस्ड तंत्रज्ञानविषयक संशोधने आणि प्रिमीयम स्टाइलसह लक्षवेधी अ‍ॅडव्हेंचर बाइक सादर करताना आम्हाला अभिमान वाटतो आहे. आजवरच्या टायगर मॉडेल्समध्ये हे सर्वांत धाडसी मॉडेल आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search