Next
धान्याला कीड लागू नये म्हणून ‘सेव्ह ग्रेन बॅग’ची निर्मिती
प्रेस रिलीज
Friday, October 06 | 11:52 AM
15 0 0
Share this story

पुणे : शेतकर्‍यांनी पोत्यात साठवलेल्या धान्याला कीड लागू नये म्हणून ‘सेव्ह ग्रेन प्लास्टिक बॅग’ या आगळ्या वेगळ्या प्लास्टिक बॅगचे संशोधन येथील पनामा फाउंडेशनचे सागर शहा यांनी केले आहे.

देशाची अर्थव्यवस्थाही शेतीवर अवलंबून आहे. देशात दरवर्षी शेतकरी हा लाखो टन धान्य पिकवत असतो. त्यातील हजारो टन वायाही जाते. त्याला अनेक कारणेही असली, तरी पोत्यात केली जाणारी ध्यान्याची साठवणूक हे ही एक कारण आहे. पोत्यात साठवलेल्या धान्याला कीड लागू नये यावर संशोधन करून सागर शहा यांनी ‘सेव्ह ग्रेन प्लास्टिक बॅग’ची निर्मिती केली. त्याला केंद्र सरकारच्या इंडियन इन्स्टिटयूट आँफ फूड प्रोसेसिंगनेही मान्यता दिली आहे. राज्यात पहिल्यादांच त्यांनी हा प्रयोग केला आहे.

पनामा फांऊडेशनच्या माध्यमातून सागर शहा यांनी हा शोध लावला असून शेतकरी, ग्राहक यांना याचा फायदा होणार आहे. ही पूर्णतः प्लास्टिक बॅग असून ५० किलोमध्ये ती उपलब्ध आहे. जपानचे तंत्रज्ञान वापरत त्यांनी ही बॅग तयार केली आहे. एथिलिन व्हिनाईल अल्कोहोल हे पॉलिमर असून कोणत्याही प्रकारचे गॅसेस या पिशवीत येत नाही. त्यामुळे धान्याला कीड लागत नाही. त्यात आधीच कीड असल्यास ते आतच मरते; तसेच नव्याने कोणतीही कीड तयार होत नाही.

या प्रकारच्या समस्येवर २०१२ पासून सागर शहा, सचिन गांगल, अंकु प्रकाश, श्रीपाद आमरे, अनिता यांनी या संशोधनाला सुरुवात केली. शेतकरी, ग्राहक यांचे हित पाहता सध्या ही बँग ७० रुपयांना उपलब्ध आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे प्रबोधन करून त्यांना किडीद्वारे साठवणुकीत होणार्‍या नुकसानीपासून वाचवणे हा शहा यांचा उद्देश आहे.

‘ही बॅग टिकाऊ असून पुन्हा पुन्हा वापरता येण्यासारखी आहे,’ अशी माहिती शहा यांनी या वेळी दिली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link