Next
स्वातंत्र्यदिनानिमित्त हडपसरमध्ये विविध कार्यक्रम
प्रेस रिलीज
Thursday, August 17, 2017 | 02:21 PM
15 0 0
Share this article:

हडपसर (पुणे) : स्वातंत्र्यदिनानिमित्त हडपसर येथे झालेल्या विविध कार्यक्रमात नगरसेवक मारुती तुपे यांनी भाग घेतला. महापालिकेच्या शाळांमध्ये स्थायी समितीचे सदस्य असलेल्या तुपे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी प्रभाग समिती अध्यक्ष योगेश ससाणे, पुणे मनपा शिक्षण विभाग कर्मचारी मंडळाचे अध्यक्ष गोरख तुपे, तसेच मुख्याध्यापिका सुर्यवंशी, इनचार्ज दगडे, माजी मुख्याध्यापक मुल्लासर, ज्येष्ठ मार्गदर्शक बबन नाना बोराटे आणि परिसरातील ज्येष्ठ नागरिक व अन्य मान्यवर उपस्थित होते. सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थिदेखील या समारंभाला उपस्थित होते.

‘अनेक देशभक्तांनी स्वातंत्र्यासाठी व देशाच्या संरक्षणार्थ आजवर अभूतपूर्व योगदान दिले आहे. भारत ही विचारवंत, संत आणि शूर-वीरांची भूमी आहे. या सर्वांचे स्मरण करुन नवनिर्माणाचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी प्रयत्न करुया,’ असे आवाहन तुपे यांनी केले. 

काळे-बोराटेनगर येथील धर्मवीर शंभुराजे प्रतिष्ठानच्या अनाथालय व वृध्दाश्रमात स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमात पंचक्रोशीतील मान्यवरांचा, विविध संघटना, संस्था तसेच सहकारी गृहरचनांचे पदाधिकारी, सैन्य दलातील जवान, त्यांचे कुटुंबीय, कार्यकर्ते यांचा आणि विविध क्षेत्रात उत्तम कार्य करणाऱ्या नागरिकांचा व ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान तुपे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

या वेळी अनाथालयातील विध्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्ताने आयोजित केलेल्या सोहळ्याचा आनंद घेत सर्वांनी एकत्रित स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. अनाथालय, वृध्दाश्रम, गोशाळा यासारख्या उपक्रमात सहकार्य करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे तुपे यांनी मनःपूर्वक आभार मानले. 

‘प्रगत शैक्षणिक उपक्रमांद्वारे भारताची नवी पिढी घडणार आहे. माहितीचे ज्ञानामध्ये रुपांतर केल्यास आणि विद्यार्थ्यांना मुल्याधिष्ठीत शिक्षण दिल्यास खऱ्या अर्थाने विद्यार्थी ज्ञानी बनतील,’ असे मत तुपे यांनी व्यक्त केले. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला 'बेटी बचाओ बेटी पढाओ'चा संदेश जनमानसात रूजवण्यासाठी शालेय स्तरावरही उपक्रम राबवण्यात यावेत,’ असे तुपे म्हणाले.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search