Next
अक्षय्य तृतीयेकरिता पेटीएम गोल्डची विशेष ऑफर
प्रेस रिलीज
Tuesday, April 17, 2018 | 06:09 PM
15 0 0
Share this story

मुंबई : अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर सोने खरेदी अधिक आनंददायी व्हावी याकरता ‘पेटीएम गोल्ड’ने दोन नवीन ऑफर्स जाहीर केल्या आहेत. झीरो जीएसटी ऑफरमध्ये ग्राहकांना त्यांच्या पेटीएम गोल्ड खरेदीवरील जीएसटीच्या किंमतीचे सोने विनामूल्य मिळेल. या ऑफरच्या अवधीत केलेल्या ५० रुपयांच्यावरील पेटीएम गोल्ड खरेदीवर ही ऑफर लागू आहे. त्याशिवाय,  ग्राहक प्रत्येक तासाला त्याच्या पेटीएम गोल्ड खरेदीच्या पाच पट  सोने जिंकू शकतो. या दोन्ही ऑफर्स १८ एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत वैध आहेत. 

पेटीएमचे वरिष्ठ उपाध्यक्ष नितिन मिश्रा म्हणाले, ‘अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पेटीएम गोल्ड खरेदी आणि भेट देण्याच्या प्रमाणात २० पट वाढ होण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षीच्या अक्षय्य तृतीयेपासून पेटीएम गोल्ड ग्राहकांनी जवळ जवळ ८०० किलो सोन्याचे व्यवहार केले आहेत. पेटीएम गोल्डने सोप्या आणि किफायतशीर पद्धतीने डिजिटल माध्यमातून सोन्याची खरेदी  करण्यास ग्राहकांना  प्रवृत्त केले आहे. आमच्या मंचाच्या मार्फत ग्राहकांना सोन्यात डिजिटल माध्यमातून गुंतवणूक करण्याची सुविधा मिळते आणि ते सोने भेट म्हणून देखील देऊ शकतात. या सणाच्या निमित्ताने सोन्याची खरेदी करणारे आणखी जास्त लोक आमच्या मंचाचा लाभ घेतील अशी आम्हाला आशा आहे. आपल्या गोल्ड-पासबुकच्या मदतीने ग्राहक सर्व व्यवहाराचा मागोवा सहजपणे घेऊ शकतात शिवाय त्यात लॉक-इन अवधीचे कुठलेही बंधन नाही. ग्राहकांचे सोने एमएमटीसी पीएएमपीच्या सुरक्षित आणि शंभर टक्के  विमाकृत लॉकर्समध्ये राहते. त्यावर कुठल्याही प्रकारचे शुल्क लागत नाही व त्यांना त्यांचे सोने केव्हाही प्राप्त करता येऊ शकते.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link