Next
जनता बँकेच्या ‘जेट पे’ अॅपचे उद्घाटन
प्रेस रिलीज
Monday, January 01, 2018 | 05:58 PM
15 0 0
Share this article:

जनता सहकारी बँकेच्या ‘जेट पे’ या अॅपचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी डावीकडून बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयंत काकतकर, बँकेचे अध्यक्ष संजय लेले, डॉ. कॅप्टन चितळे आदी मान्पुणे : बदलत्या काळानुसार अत्याधुनिक बँकिंग सेवा देणाऱ्या येथील जनता सहकारी लि. या मल्टीस्टेट शेड्यूल बँकेने ‘युपीआय’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ‘जेट पे’ (जनता ईझी ट्रान्सफर) हे नवीन अॅप विकसित केले आहे. या अॅपचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांच्या हस्ते ३० डिसेंबरला करण्यात आले.

या वेळी बँकेचे अध्यक्ष संजय लेले, संचालक मंडल सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी जयंत काकतकर, डॉ. कॅप्टन चितळे, आदी मान्यवर उपस्थित होते. जनता बँकेने नुकतेच रुपे डेबिट कार्डाचे प्लॅटिनम कार्ड वितरीत करण्यास प्रारंभ केला आहे. या कार्डच्या माध्यमातून ग्राहकांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध होणार आहेत.

या प्रसंगी डॉ. उमराणी म्हणाले, ‘जनता सहकारी बँकेने जेट पे अॅपच्या माध्यमातून डिजिटल इंडिया या चळवळीमध्ये सहभाग घेतला आहे. सर्वसामान्य ग्राहकांना जेट पेच्या माध्यमातून सहजरीत्या पैशांची देवाणघेवाण करणे शक्य होणार आहे. ही सेवा जास्तीत जास्त ग्राहकांनी वापरावी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून घ्यावा.’

युनिफाइड पेमेंट इंटरफेस (युपीआय) या तंत्रज्ञानावर ‘जेट पे’ अॅप आधारित असून, याच्या माध्यमातून अतिशय वेगात आपण बँकेचा खाते क्रमांक, आयएफएससी कोड, मोबाइल क्रमांक किंवा आधार क्रमांकांचा वापर करून पैशांची देवाणघेवाण करू शकतो. हे अॅप गुगल प्ले स्टोअरवर देखील आता उपलब्ध झाले असून, याच्या माध्यमातून ग्राहक ३६५ दिवस आर्थिक व्यवहार करू शकतो.

‘जेट पे’द्वारे केलेले व्यवहार हे अतिशय सुरक्षित असून आपण केलेल्या व्यवहाराची सविस्तर माहिती ‘मॅनेज अकाउंट’ या एका रजिस्टरच्या माध्यमातून आपल्याला कळू शकते. ‘जेट पे’ हे कुठल्याही स्मार्टफोनवर सहज डाऊनलोड करता येऊ शकते. या द्वारे आपण बँक टू बँक व्यवहारदेखील करू शकतो.

‘जेट पे या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अॅपचा ग्राहकांनी जरूर वापर करावा. या अॅपमुळे डिजिटल व्यवहार करणे आता सहज शक्य होणार आहे. या अॅपसंबंधीची सविस्तर माहिती जनता बँकेच्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध आहे,’ असे बँकेचे अध्यक्ष लेले यांनी सांगितले.

रुपे डेबिट कार्डाचे प्लॅटिनम कार्डच्या माध्यमातून दिवसाला ४० हजार रुपये काढण्याची सोय उपलब्ध आहे. देशातील ११ शहरांतील विमानतळांवरील वेगवेगळ्या खरेदीसाठी या कार्डाचा उपयोग केला जाणार आहे. दोन लाखाचा अपघात विमा, कॅशबॅक, टेलिफोन, इलेक्ट्रिसिटी, गॅस यांची बिलेही या कार्डच्या सहाय्याने ग्राहकांना भरता येतील, असे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी काकतकर यांनी सांगितले.

जनता बँकेच्या महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यात सध्या ७० शाखा कार्यरत असून, बँकेचा आज अखेरचा एकूण व्यवसाय सुमारे १३ हजार ८०० कोटींपेक्षा अधिक आहे. जनता बँकेचे पदाधिकारी यशवंत ढवळीकर यांनी स्वागत केले. काकतकर यांनी प्रास्ताविक केले. संचालक सुधीर पंडित यांनी आभार मानले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search