Next
भविष्यात डेटा सायन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञांना वाढती मागणी
प्रेस रिलीज
Monday, February 18, 2019 | 03:41 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सायन्स तज्ज्ञांना आघाडीच्या टेक कंपन्यामध्ये वाढती मागणी असून, आगामी काळात आयटी सॉफ्टवेअर क्षेत्रात डेटा सायन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सिक्युरिटी आणि प्रोग्रेसिव्ह अॅप्ससारख्या तंत्रज्ञानामध्ये रोजगाराच्या मुबलक संधी उपलब्ध होणार असल्याचे ‘शाइन डॉटकॉम’ या भारतातील आघाडीच्या ऑनलाइन जॉब पोर्टलने हायरिंग ट्रेंडसंदर्भात केलेल्या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे.

या क्षेत्रात स्वतःला सिद्ध करायचे झाल्यास आयटी व्यावसायिकांना आपली कौशल्ये विकसित करण्याचीदेखील गरज असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.  बीपीओ, केपीओ क्षेत्रातही तंत्रज्ञानाच्या व्यापक विकासामुळे रोजगारांच्या संधी वाढल्या आहेत आणि हा कल २०१९मध्येही कायम राहणार आहे.

बेंगळूरू, मुंबई, दिल्ली आणि चेन्नईसारख्या मेट्रो शहरांनी सर्वोच्च प्रतिभेची मागणी असलेल्या क्षेत्रात आपली मक्तेदारी कायम ठेवली आहे. तथापि हैदराबाद, पुणे, कलकत्ता आणि अहमदाबादसारख्या उदयोन्मुख शहरांनीसुद्धा हायरिंगच्याबाबतीत २०१८मध्ये अपवादात्मक चांगली कामगिरी करून प्रादेशिक जॉब हब असल्याचा दावा केला आहे. गेल्या वर्षात, आयटी क्षेत्रातील वाढीच्या बळावर हैदराबाद हायरिंगमध्ये पाच अग्रेसर शहरांच्या यादीत सामील झाले आहे. ‘शाइन डॉटकॉम’च्या अंदाजानुसार, टियर टू शहरातील वृद्धीचे श्रेय त्या-त्या भौगोलिक क्षेत्रांमधील एफएमसीजी-ग्राहकोपयोगी टिकाऊ वस्तू, फार्मास्युटिकल्स व आरोग्यसेवा, आणि ऊर्जा व नूतनीकरण या क्षेत्रांच्या वाढीस आहे.

या शिवाय भारतात अनेक उत्पादन प्रकल्प उभारले जात असल्याने जिथे हे उत्पादन प्रकल्प आहेत, त्या टियर टू आणि थ्री शहरांमध्ये रोजगारनिर्मिती होईल. फिनटेक फर्म्स, मोबाइल वॉलेट्स आणि अनेक पेमेंट अॅप्समुळे बीएफएसआय क्षेत्राची स्थिर वृद्धी झाली आहे ज्यामुळे २०१९मध्येसुद्धा रोजगार निर्मितीच्या मुख्य उद्योगांत त्याचे स्थान अढळ राहील. २०१९मध्ये हायरिंग क्षेत्रात वृद्धी दर्शवणाऱ्या उदयोन्मुख उद्योगांमध्ये शिक्षण आणि आरोग्यसेवा समाविष्ट आहेत. या दोन क्षेत्रांमध्ये २०१८मध्ये अनेक तंत्रज्ञानातील स्टार्टअप्स सुरू झाले आहेत आणि २०१९मध्येही या क्षेत्रात वृद्धी आणि रोजगारनिर्मिती होईल.

महत्त्वाची बाब म्हणजे अभियांत्रिकी आणि बांधकाम यांसारख्या उद्योगांत हायरिंगमध्ये वाढ दिसून आली आणि २०१९च्या प्रथम दहाच्या सूचीमध्ये त्यांचा समावेश झाला. अहवालानुसार टियर टू क्षेत्रातील अभियांत्रिकी आणि बांधकाम क्षेत्रात हायरिंगमधील झालेली वृद्धी पायाभूत सुविधांच्या प्रगतीमुळे असू शकते.

‘शाइन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी झैरस मास्टर म्हणाले, ‘सर्व उद्योगांमध्ये तंत्रज्ञानवर लक्ष केंद्रित केल्यामुळे मागील वर्षी हायरिंग डोमेनमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. आम्ही आरोग्यसेवा आणि बीएफएसआय क्षेत्रातील जलद वृद्धी पाहिली आहे. या डोमेनमधील कर्मचारी नवीन कल्पना आत्मसात करत आहेत आणि प्रक्रिया सुधारत आहेत. २०१९ आणि पुढील काळात बेंगळूरू, मुंबई आणि दिल्ली ही शहरे हायरिंगमध्ये त्यांचे अव्वल स्थान कायम ठेवतील अशी अपेक्षा आहे. तथापि इंदूर आणि जयपूरसारख्या टियर टू शहरांनी पुढील काही वर्षांत अव्वल स्थान पटकावले, तर आम्हाला आश्चर्य वाटणार नाही. त्याशिवाय, शिक्षण आणि प्रशिक्षण क्षेत्र गतिशील होताना पाहून आनंद होत आहे, आयटी आणि इतर क्षेत्रांत तंत्रज्ञानाच्या दृष्टीने प्रगत अशा जॉब-रोल्ससाठी व्यावसायिक नवीन कौशल्ये शिकून सज्ज होत आहेत.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search