Next
अंधश्रद्धा पसरवणाऱ्या कृतींना आळा
BOI
Saturday, April 22, 2017 | 06:56 PM
15 5 1
Share this article:

बाहुल्या, चिठ्ठ्या, लिंबांनी लगडलेली  झाडेपुणे : काळ कितीही पुढे गेला असला तरी समाजातील अंधश्रद्धा पूर्णपणे संपत नाहीयेत. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर अनेक प्रयत्न केले जात आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) जिल्हा कार्याध्यक्षा नंदिनी जाधव यांनी पोलीस व ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांच्या साह्याने खडकीमधील अंधश्रद्धा पसरवणाऱ्या कृतींना नुकताच आळा घातला आहे. 

खडकी येथील होळकर पुलाजवळील झाडांमध्ये करणी-कवटाल निस्तरण्याचे काम एक भोंदूबाबा करत असल्याची माहिती जाधव यांना मिळाली. कथित बाबा, आलेल्या ग्राहकांना हजारो रुपयांना गंडा घालतो, अशी माहिती त्यांना मिळाली. हा बाबा आपल्या ग्राहकांना टाचण्या, काळ्या बाहुल्या, दाभण, खिळे, बिब्बे, बाधितांचे फोटो व एका चिठ्ठीवर त्याच्या त्रासांबद्दल लिहून चार-पाच पदरी घडी घालून ती खिळ्याने झाडाच्या बुंध्यावर ठोकायला लावतो. झाडांच्या बुंध्यावर शेजारी-शेजारी या अशा चिठ्ठ्यांसह काळ्या बाहुल्या इतक्या दाटीवाटीने ठोकल्या होत्या, की मूळ खोडाची सालही दिसत नाही.

झाडांवरील खिळे काढताना नंदिनी जाधवजाधव यांनी स्वतः या ठिकाणाला भेट देऊन झाडांची अवस्था पाहिली व नंतर ‘अंनिस’चे कार्यकर्ते, पोलीस असा सगळा लवाजमा घेऊन, त्या झाडांवरील लिंबू, चिठ्ठ्या, काळ्या बाहुल्या काढण्यात आल्या. सुमारे तास-दीड तासाच्या मेहनतीनंतर दोन मोठी पोती भरून वस्तू या झाडांवरून निघाल्या. कार्यकर्ते येतानाच आपल्यासोबत आंबूर, पक्कड, कटावण्या इत्यादी साहित्य घेऊन आले होते.

या वेळी मरीआई चौकीचे पीएसआय शिवाजी भोसले यांनी आपल्या चमूसह चार झाडांना वेदनामुक्त केले. यात सुभाष सोळंकी, श्रीराम नलावडे, देविदास इंगळे व भगवान काळभोर हे पिंपरी चिंचवड शाखेचे कार्यकर्ते सामील झाले होते. दीपक अंभोरे व प्रतीक कालेकर हेही या कामात सहभागी झाले होते.

झाडांवरून काढलेल्या सर्व बाहुल्या तेथेच जाळण्यात आल्या. लवकरच, या जागी ‘असे प्रकार करू नयेत’ अशा आशयाचे सूचनाफलक लावण्यात येणार आहेत. असे प्रकार करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासनही पोलिसांनी दिले आहे.

झाडांवरून काढलेल्या वस्तूंची होळी पेटवताना कार्यकर्तेमिलिंद देशमुख, ‘अंनिस’ची पिंपरी-चिंचवड टीम, खडकी पोलीस स्टेशनचे पीआय लक्ष्मण बोराटे, पोलीस हवालदार जगताप, सकट, शिरके, पोलीस जमादार पठाण यांच्या सहकार्याने हे कार्य पार पाडण्यात आले.

कारवाईबद्दल  नंदिनी जाधव यांनी दिलेली माहिती खालील व्हिडीओमध्ये पाहता येईल. 
 
15 5 1
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 102 Days ago
Superstitions die hard . What is more , there are people who make a living by propagating them . It will take a long time .Hpwever , it is necessary to fight them .
0
0
देविदास इंगळे About
झाडाच्या खोडावरील खिळे आताशा काढून होत आहेत. पण अजून डोक्यात ठोकलेल्या अंधश्रध्दांचे खोलवर रुतलेले खिळै उपसून काढायचेत. पण आम्ही हारणार नाही. हम होंगे कामयाब.. हम होंगे कामयाब.. हम होंगे कामयाब एक दिन s s ss
0
0
sonu About
nice news.
1
0

Select Language
Share Link
 
Search