Next
तुकाराम महाराजांची पालखीही सोलापूर जिल्ह्यात दाखल
जिल्ह्यातील पहिले रिंगण सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात
BOI
Wednesday, July 18, 2018 | 06:09 PM
15 1 0
Share this article:सोलापूर :
मुखात हरिनामाचा जयघोष आणि टाळ-मृदंगाचा गजर करत देहूहून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज (१८ जुलै) सोलापूर जिल्ह्यात अकलूज येथे आगमन झाले. या वेळी जिल्ह्यातील पहिले गोल रिंगण पार पडले.सोलापूर व पुणे जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सराटी पुलावर पालखीच्या स्वागतासाठी सकाळी सात वाजल्यापासूनच वारकरी, भाविक, तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांची गर्दी होऊ लागली. या ठिकाणी विविध योजनांबाबत जनजागृती करणारे कार्यक्रम सादर करण्यात आले. निरा नदी ओलांडून सुमारे साडेआठच्या सुमारास तुकाराम महाराजांच्या पालखीचे आगमन झाले. पालकमंत्री विजय देशमुख आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी अश्वपूजन व पादुकांचे पूजन केले. पालखी स्वागतस्थळापासून ते अकलूज शहरापर्यंत पालखीचे सारथ्य पालकमंत्री विजय देशमुख यांनी केले. या वेळी त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले आणि आमदार हणमंत डोळस उपस्थित होते.पालखीच्या स्वागताला माळशिरस पंचायत समितीच्या सभापती वैष्णवीदेवी मोहिते-पाटील, पोलीस अधीक्षक एस. वीरेश प्रभू, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुमेध अणदूरकर, उपविभागीय अधिकारी शमा ढोक-पवार, तहसीलदार बाई माने यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, अधिकारी व अकलूजचे ग्रामस्थ उपस्थित होते.अकलूज गांधी चौकात अकलूज ग्रामपंचायतीच्या वतीने खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीचे स्वागत करण्यात आले. यानंतर पालखी सोहळा अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात दाखल झाला. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील जिल्ह्यातील पहिले गोल रिंगण येथे झाले. अश्व रिंगणात धावण्याचा नेत्रदीपक क्षण वारकरी, भाविकांनी याचि देही याचि डोळा अनुभवला. तत्पूर्वी पताका, हंडे-तुळशी, टाळ-मृदंग, विणेकरी यांचे रिंगण झाले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते अश्वपूजन केल्यानंतर अश्व रिंगणी धावले.रिंगण सोहळ्यासाठी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, जयसिंह मोहिते-पाटील, मान्यवर पदाधिकारी व मोहिते-पाटील कुटुंबीय उपस्थित होते.


 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
अशोक गायकवाड About
खुप छान रिंगन सोहळा
0
0
दत्ता भोसले About
नेत्रदिपक रिंगण सोहळा
0
0

Select Language
Share Link
 
Search