Next
पुण्यात जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा
पवार पब्लिक स्कूल, ‘अमोल बुचडे’, मुंबई बॉइज, बीव्हीबी संघ अंतिम फेरीत
प्रेस रिलीज
Monday, December 17, 2018 | 04:20 PM
15 0 0
Share this article:

जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेच्या १७ वर्षांखालील गटाच्या उपांत्य फेरीतील मिलेनियम (पांढरी जर्सी) विरुद्ध पवार स्पोर्ट्स अकादमी (लाल जर्सी) यांच्या सामन्यातील एक क्षण.

पुणे : सखाराम मोरे क्रीडा प्रतिष्ठान व आर्य क्रीडोद्धारक मंडळी यांच्या वतीने २४ वी जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यात पवार पब्लिक स्कूल, अमोल बुचडे स्पोर्ट्स फाउंडेशन, मुंबई बॉइज आणि बीव्हीबी संघांनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन करीत अंतिम फेरीत धडक मारली.

स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या १७ वर्षांखालील मुलांच्या उपांत्य फेरीच्या लढतीत बारामतीच्या पवार पब्लिक स्कूल संघाने मिलेनियम स्कूल संघाला १२-२५, २५-२३, १५-९ असे पराभूत केले. पवार पब्लिक स्कूल संघाकडून संभाजी घाडगे, प्रतिक चांगुडे, पृथ्वीराज चव्हाण, सागर थोरात हे विजयाचे शिल्पकार ठरले. मिलेनियम स्कूलच्या संघाकडून विपुल कदम, कहान दांडेकर, ओम बांगडे, देव जवळी यांनी प्रयत्न केले. १७ वर्षांखालील मुलांच्या गटात अमोल बुचडे स्पोर्ट्स फाउंडेशन संघाने सिंबायोसिस स्कूल संघाला २५-१४, २५-२० असे पराभूत केले. अमोल बुचडे स्पोर्ट्स फाउंडेशन संघाकडून प्रेम जाधव, राज मोरे, राजवर्धन एम. यांनी विजय मिळवून दिला. सिंबायोसिस संघाकडून आदित्य भिलारे, अर्णव बारमेचा आणि शुभम एस यांनी चांगली लढत दिली.

१७ वर्षांखालील गटातील अमोल बुचडे स्पोर्ट्स फाउंडेशन (पांढरी-जांभळी जर्सी) विरुद्ध सिंबायोसिस स्कूल (पांढरी जर्सी)  यांच्यातील सामना

१४ वर्षांखालील मुलांच्या उपांत्य फेरीच्या लढतीत मुंबई बॉइज संघाने न्यू इंग्लिश स्कूल (बारामती) संघाला २५-२२, २०-२५, १५-९ असे पराभूत करताना अंतिम फेरीत धडक मारली. विजयी संघाकडून सोहम मोरे, तनय दिघे, अतुल मिश्रा यांनी संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. न्यू इंग्लिश स्कूल (बारामती) संघाकडून प्रज्वल ननावरे, ओमकार मानकर, ऋषिकेश जंजिरे यांनी दिलेली लढत अपुरी ठरली.

उपांत्य फेरीत १४ वर्षांखालील गटातील मुंबई बॉइज (काळी जर्सी) विरुद्ध पवार स्पोर्ट्स अकादमी (काळी -लाल जर्सी) यांच्यात सुरू असलेला सामना१४ वर्षांखालील मुलींच्या उपांत्य लढतीत बीव्हीबी संघाने कलमाडी हायस्कूल संघाला २५-१५, २५-१६ असे पराभूत केले. बीव्हीबी संघाकडून ईशा बनकर, समीक्षा शितोळे, स्वामिनी सूर्यवंशी, सृष्टी धोत्रे यांनी सुरेख खेळाचे प्रदर्शन केले. कलमाडी हायस्कूल संघाकडून सानिका करणे, ईरा ओझा, तनया मोरे, ग्रीष्मा करणे यांनी लढत देण्याचा प्रयत्न केला.

उपांत्य फेरीचा निकाल : १७ वर्षांखालील मुले- पवार पब्लिक स्कूल विरुद्ध मिलेनियम स्कूल २-१ (१२-२५, २५-२३, १५-९), अमोल बुचडे स्पोर्ट्स फाउंडेशन विरुद्ध सिंबायोसिस : २-० (२५-१४, २५-२०). १४ वर्षांखालील मुले- मुंबई बॉइज विरुद्ध न्यू इंग्लिश स्कूल (बारामती) २-१ (२५-२२, २०-२५,१५-९). १४ वर्षांखालील मुली- बीव्हीबी विरुद्ध कलमाडी हायस्कूल २-० (२५-१५, २५-१६).
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search