Next
नागवेल
BOI
Friday, February 08, 2019 | 10:07 AM
15 0 0
Share this story

‘नागवेल’ ही कादंबरी म्हणजे ज्ञानेश्वर नावाच्या एका हुशार तरुणाची गोष्ट आहे. खूप अभ्यास करून नाव कमवायचे आणि मराठी साहित्याची आवड जोपासायची, अशी त्याची इच्छा असते; पण रोजीरोटीसाठी त्याला त्याच्या भावोजींना मदत करावी लागते आणि त्यासाठी त्याला पानवाला बनावे लागते.

दारिद्र्याचे दशावतार तो पाहत/भोगत असतो; त्यातून बाहेर पडून एका चांगल्या संस्थेत उत्तम वेतन असलेला प्राध्यापक बनायचे स्वप्न तो नेहमी पाहत असे. त्याच्यासारख्याच अत्यंत गरीब तरुणांच्या आयुष्यात बदल घडवायची आणि त्यांना मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा देण्याची त्याची इच्छा होती. ही कल्पना त्याला कॉलेजमधील त्याचे लाडके प्राध्यापक सोनटक्के यांच्याकडे पाहून सुचली होती. प्रा. सोनटक्के यांची शिकवण्याची पद्धत अशी होती, की सगळे विद्यार्थी अगदी मंत्रमुग्ध होऊन जात. ज्ञानेश्वरच्या जीवनात त्यांचे स्थान महत्त्वाचे होते.

तशीच आणखी एक व्यक्तीही ज्ञानेश्वरच्या आयुष्यात विशेष महत्त्वाची होती, ती म्हणजे सविता - त्याचे प्रेम. कॉलेजमध्ये असताना सविता त्याच्या वर्गात होती. त्यांची अनेक वर्षांची मैत्री खुलत जाऊन तिचे रूपांतर हळूहळू प्रेमात झाले होते; पण ही कादंबरी म्हणजे प्रेमकथा नाही. ही अशा एका मुलाच्या संघर्षाची गोष्ट आहे, की जो अत्यंत गरिबीच्या परिस्थितीत असूनही तो खूप मोठा होण्याच्या स्वप्नाचा पाठलाग करत होता. सध्याची शिक्षणव्यवस्था भ्रष्टाचार आणि वशिलेबाजीने ग्रासलेली आहे. अशा स्थितीतही तो स्वतःचे स्वतंत्र स्थान मिळवण्यासाठी झगडत होता. 

त्याने सुवर्णपदक मिळविले होते; पण त्याच्या खिशात दमडीही नव्हती. अशा स्थितीत पाच हजार रुपये मानधनाच्या पुढे त्याची प्रगती होईल का? दोघांच्या आर्थिक परिस्थितीत असलेली प्रचंड दरी पाहता तो सविताशी लग्न करू शकेल का? त्याचे मित्र हा नेहमीच त्याचा मोठा आधारस्तंभ होता; पण असे आणखी कोणी होते का, की जे त्याचा हा संघर्ष/धडपड पाहत होते आणि त्याला मदत करू इच्छित होते? तो त्याचे स्वप्न पूर्ण करू शकतो का? की त्याला पुन्हा पानवालाच बनावे लागते? या प्रश्नांच्या उत्तरासाठी ‘नागवेल’ ही कादंबरी वाचायलाच हवी. 

प्रा. नवनीत देशमुख यांची ‘नागवेल’ ही कादंबरी वाचकाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवते. ही कादंबरी म्हणजे केवळ मनोरंजन नाही, तर ती वाचकांच्या मनाला हात घालणारी आणि स्वप्ने पाहण्याची प्रेरणा देणारी गोष्ट आहे.

पुस्तक : नागवेल
लेखक : नवनीत देशमुख
प्रकाशक : नमिता ग्रंथ वितरण, वर्धा
पाने : ३१४
किंमत : ४२५ रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link