Next
भारतीय मजदूर संघाचा ठाणे जिल्हा मेळावा उत्साहात
BOI
Wednesday, January 02, 2019 | 03:06 PM
15 0 0
Share this article:



ठाणे : भारतीय मजदूर संघाच्या ठाणे जिल्ह्याचा मेळावा डोंबिवली येथील कानविंदे व्यायाम शाळेच्या सभागृहात नुकताच उत्साहात झाला. या मेळाव्याला भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री रवींद्र देशपांडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.  

मजदूर संघाच्या प्रथेप्रमाणे श्रमिक गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रमुख पाहुण्यांच्या स्वागत परिचयानंतर भारतीय मजदूर संघाचे ठाणे जिल्हा सरचिटणीस मोहन येणारे यांनी जिल्ह्याचा २०१६-२०१८ असा दोन वर्षांचा अहवाल सादर केला. कोषाध्यक्ष अर्जुन साळुंखे यांनी दोन वर्षांचा आर्थिक ताळेबंद सादर केला. या मेळाव्याला भारतीय मजदूर संघाच्या ठाणे जिल्ह्याशी संबंधित जवळपास १२ उद्योगांचे शंभर प्रतिनिधी उपस्थित होते; त्यातील काही प्रमुख उद्योगांनी आपले निवेदन सादर केले.



प्रदेश महामंत्री देशपांडे यांनी ठाणे जिल्ह्याची २०१९ ते २०२१ या दोन वर्षासाठी जिल्हा कार्यकारणी घोषित करून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. नवीन कार्यकारणीमध्ये शोभा अंबरकर यांची अध्यक्षपदी, तर भरत गोडांबे यांची जिल्हा चिटणीस म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. मेळाव्याच्या समारोपप्रसंगी नवनिर्वाचित जिल्हा चिटणीस गोडांबे यांनी आभार प्रदर्शन केले. वंदे मातरम् गीताने मेळाव्याची सांगता झाली.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search