Next
कन्याशाळेतील गरजू विद्यार्थिनींना गणवेश प्रदान
प्रेस रिलीज
Saturday, July 14 | 04:29 PM
15 0 0
Share this story

श्री. ना. दा. ठाकरसी कन्याशाळेतील ५० गरजू विद्यार्थिनींना अमित एंटरप्रायझेस हाउसिंग लिमिटेडतर्फे गणवेश व शाळेचे बूट देताना एंटरप्रायझेसच्या संचालिका भारती पाटे.

पुणे : श्री. ना. दा. ठाकरसी कन्याशाळेतील ५० गरजू विद्यार्थिनींना अमित एंटरप्रायझेस हाउसिंग लिमिटेड यांच्यातर्फे गणवेश व शाळेचे बूट यांचे वाटप करण्यात आले. या विद्यार्थिनींचे या वर्षीचे शैक्षणिक शुल्क देखील संस्थेने भरले आहे. शाळेत आयोजित करण्यात आलेल्या समारंभात गुरूवारी अमित एंटरप्रायझेसच्या संचालिका भारती किशोर पाटे यांच्या हस्ते या विद्यार्थिनींना गणवेश वाटप करण्यात आले.

शाळेच्या मुख्याध्यापिका सुवर्णलता काळे, एसएनडीटी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य माधवी कुलकर्णी, श्री. ना. दा. ठाकरसी कन्याशाळा व कनिष्ठ महाविद्यालय संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आनंद जुमळे, समर्थ मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष भगवान देशपांडे, अमित एंटरप्रायझेसचे सहाय्यक महाव्यवस्थापक (आस्थापना) दिनेश बोरलीकर या वेळी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link