Next
‘फोर्ब्ज’च्या यादीत १०१ भारतीय
BOI
Tuesday, March 21, 2017 | 05:17 PM
15 1 0
Share this article:

मुकेश अंबानीनवी दिल्ली : इतर देशांच्या तुलनेत जास्तीत जास्त अब्जाधीश असण्याचा आपला विक्रम कायम ठेवत संयुक्त राष्ट्रांनी ५६५ अब्जाधीशांसह पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. फोर्ब्ज मासिकाने नुकतीच अब्जाधीशांची यादी प्रसिद्ध केली आहे.    

फोर्ब्ज मासिकाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अब्जाधीशांच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर असून, रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी आपले वर्चस्व कायम ठेवून, १०१ भारतीय अब्जाधीशांच्या यादीत अग्रस्थानी राहण्याचा मान पुन्हा एकदा पटकावला आहे. 

२०१७च्या या अब्जाधीशांच्या यादीत जगभरातील दोन हजार ४३ अब्जाधीशांचा समावेश करण्यात आला आहे. या सर्वांचे एकत्रित संपत्ती मूल्य ७६७ लाख कोटी डॉलर इतके असल्याचे सांगण्यात आले आहे. या विक्रमात मागील वर्षीपेक्षा १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे या वर्षी पहिल्यांदाच भारताने स्वतंत्र अब्जाधीशांच्या यादीत १००चा आकडा पार केला आहे. विविध देशांमधील अब्जाधीशांच्या या यादीत जवळजवळ भारतीय वंशाच्या वीस व्यक्तींचा समावेश आहे. 

२३.२ अब्ज डॉलर एवढे मूल्य असलेल्या संपत्तीचे मालक आणि भारताच्या यादीत अग्रस्थानी असलेले मुकेश अंबानी (५९) जागतिक अब्जाधीशांच्या यादीत ३३व्या स्थानावर आहेत. त्यांचे बंधू अनिल अंबानी यांचे संपत्तीमूल्य २.७ अब्ज डॉलर असून, ते ७४५व्या स्थानावर आहेत. याशिवाय ‘आर्सेलर मित्तल’चे लक्ष्मी मित्तल १६.४ अब्ज डॉलर मूल्याच्या संपत्तीसह यादीत ५६व्या स्थानावर आहेत. 

चार भारतीय महिलांचाही समावेश
जागतिक अब्जाधीशांच्या यादीत चार भारतीय महिलांचा समावेश असून, त्यात जिंदाल उद्योगसमूहाच्या सावित्री जिंदाल ३०३व्या क्रमांकावर आहेत. याशिवाय गोदरेजच्या स्मिता कृष्णा ८१४व्या, ‘बायोकॉन’च्या किरण मुजुमदार-शॉ ९७३व्या, तर ‘यूएसव्ही इंडिया’च्या लीना तिवारी १०३०व्या क्रमांकावर आहेत.
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search