Next
कोहिनूर समूहाची मातोश्री इस्टेटशी भागीदारी
‘नवी तुळशीबाग- मारणे प्लाझा’ प्रकल्पासाठी सहकार्य
प्रेस रिलीज
Friday, December 21, 2018 | 04:35 PM
15 0 0
Share this article:

‘नवी तुळशीबाग-मारणे प्लाझा’ या प्रकल्पासाठी कोहिनूर समूह व मातोश्री इस्टेट कंपनी यांच्यातील भागीदारीची घोषणा करताना (डावीकडून)राधिका बिर्ला, दीपक मारणे, कृष्णकुमार गोयल आणि विनीत गोयल.

पुणे : बांधकाम व्यवसायातील एक अग्रगण्य नाव म्हणून सुपरिचित असलेल्या कोहिनूर समूहाने तुळशीबाग येथे साकारत असलेल्या ‘नवी तुळशीबाग-मारणे प्लाझा’ या शॉपिंग कॉम्प्लेक्स प्रकल्पासाठी मातोश्री इस्टेट या कंपनीशी भागीदारी केली आहे. याविषयीची अधिकृत घोषणा कोहिनूर समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कृष्णकुमार गोयल यांनी पत्रकार परिषदेत केली. या वेळी कोहिनूर समूहाचे सहव्यवस्थापकीय संचालक विनीत गोयल, मातोश्री इस्टेट प्रा. लि. चे अध्यक्ष दीपक मारणे आणि राधिका बिर्ला आदी उपस्थित होते.

‘स्त्रीवर्गाची खरेदीसाठी अत्यंत आवडीची जागा असलेल्या तुळशीबागेतच ‘नवी तुळशीबाग-मारणे प्लाझा’ हे शॉपिंग कॉम्प्लेक्स साकारत आहे. या वैशिष्ट्यपूर्ण शॉपिंग कॉम्प्लेक्समुळे तुळशीबागेतील शॉपिंगची ती नेहमीचीच मजा घेता येईल, पण त्याला जोड असेल ती काही आधुनिक सुविधांची. यामध्ये योग्य अशा मोकळ्या जागा, स्वच्छतागृहे आणि उपहारगृह यांचा समावेश आहे. यामुळे ग्राहकांचा प्रामुख्याने स्त्रीवर्गाचा खरेदीचा आनंद द्विगुणीत होण्यास मदत होईल. वातानुकुलीत असणाऱ्या या इमारतीची रचना ही येथे येणाऱ्या पारंपरिक ग्राहकांच्या सवयी व गरजा लक्षात घेऊनच करण्यात आली आहे. सुमारे दीड लाख चौरस फूट इतक्या प्रशस्त जागेत विस्तारलेला आणि तुळशीबागेसारख्या अत्यंत मध्यवर्ती व मोक्याच्या ठिकाणी साकारत असलेला अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प आहे. येथे येणाऱ्या ग्राहकांसाठी मुबलक पार्किंगची सुविधा उपलब्ध असेल’,अशी माहिती गोयल यांनी दिली.   
  
कोहिनूर समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कृष्णकुमार गोयल व  समूहाचे सहव्यवस्थापकीय संचालक विनीत गोयल.

या भागीदारीविषयी बोलताना विनीत गोयल म्हणाले, ‘व्यावसायिक संकुलांची निर्मिती करण्यात कोहिनूर समूहाला असलेल्या प्रदीर्घ अनुभवाचा वापर करून हा प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्यावर विशेष भर देण्यात येईल. कोहिनूर समूहातर्फे आजवर सुमारे सात लाख फूट इतके बांधकाम असलेल्या व्यापारी संकुलांची यशस्वी उभारणी करण्यात आली आहे. समूहातर्फे सध्या सुमारे २० लाख चौरस फूट इतके बांधकाम असलेल्या वेगवेगळ्या व्यावसायिक संकुलांचे बांधकामदेखील हाती घेण्यात आले आहे.’

‘नजीकच्या भविष्यात बांधकाम क्षेत्रात निवासी क्षेत्रासह व्यावसायिक जागांची निर्मिती करण्यावर आमचा विशेष भर असेल. त्यासाठी आम्ही योग्य कंपन्यांसोबत योग्य अशा व्यावसायिक प्रकल्पांसाठी भागीदारी करण्यास उत्सुक आहोत’, असे देखील गोयल यांनी आवर्जून नमूद केले.                                                               
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search