Next
‘केशायुर्वेद’तर्फे २७ जानेवारीला आंतरराष्ट्रीय परिसंवाद
प्रेस रिलीज
Friday, January 25, 2019 | 03:54 PM
15 0 0
Share this article:

पुणे : वैद्य हरीश पाटणकर यांच्या संकल्पनेतून आणि बीव्हीजी इंडियाच्या सहकार्याने साकारलेल्या ‘केशार्युवेद’ या  भारतातील पहिल्या आयुर्वेदीय हेअर टेस्टिंग लॅब आणि संशोधन केंद्रातर्फे ‘इनोव्हेटिव्ह आयुर्वेद’ यावर आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. २७ जानेवारी २०१९ रोजी सकाळी ९.३० वाजता सेनापती बापट रस्त्यावरील आयसीसी टॉवरमधील सुमंत मूळगावकर सभागृहात हा परिसंवाद होईल.

या वेळी नेत्रचिकित्सक डॉ. स्नेहल पाटणकर यांचे ‘आयुर्वेदिय केश परीक्षण पद्धती व महत्त्व’ या विषयावर बीजभाषण होणार आहे. वैद्य पाटणकर ‘केश व त्वचा विकारांवरील आयुर्वेदिय चिकित्सा’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बीव्हीजी इंडियाचे उपाध्यक्ष डॉ. दत्ताजी गायकवाड, संचालिका वैशाली हणमंत गायकवाड, लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल हसमुखभाई मेहता यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. आयुर्वेदात इनोव्हेशन करू इच्छिणार्‍यांसाठी ‘इन्व्हेस्टर्स-इनोव्हेटर्स मीट’चेही या वेळी आयोजन केले आहे.

परिसंवादाविषयी :
दिवस :
२७ जानेवारी २०१९
वेळ : सकाळी ९.३० वाजता
स्थळ : सुमंत मूळगावकर सभागृह, आयसीसी टॉवर, सेनापती बापट रस्ता, पुणे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search