Next
महामार्गांवर दारूबंदीची अंमलबजावणी
BOI
Saturday, April 01, 2017 | 04:09 PM
15 0 0
Share this article:

नवी दिल्ली : राष्ट्रीय आणि राज्य महामार्गापासून ५०० मीटरपर्यंतच्या अंतरावरील दारूची दुकाने बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. ही बंदी आज, शनिवारपासून (एक एप्रिल) लागू झाली आहे. मद्यपान करून गाडी चालवल्याने होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

या नियमानुसार सुमारे १२ हजारांहून अधिक दुकाने बंद होणार असून, यामुळे महाराष्ट्र राज्य सरकारला सात हजार कोटी रुपयांहून अधिक महसुलाचा फटका बसणार आहे. असे करत असताना सर्वोच्च न्यायालयाने सर्व कायदेशीर पळवाटा बंद केल्या असून, १५ डिसेंबरनंतर परवाना दिलेली दुकाने बंद होणार आहेत. मेघालय, हिमाचल प्रदेश आणि सिक्कीम ही तीन राज्ये आणि २० हजार आणि त्याहून कमी लोकसंख्या असलेल्या गावांसाठी हे अंतर २२० मीटरपर्यंत कमी करण्यात आले आहे. 

न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आणि न्या. एल. एन. राव यांच्या खंडपीठाने मागील वर्षी दिलेल्या दिलेल्या निर्णयात काही बदल केले आहेत. १५ डिसेंबर २०१६च्या निकालापूर्वी परवाना दिलेला असल्यास तो यावर्षीच्या सप्टेंबर महिन्यापर्यंत वैध समजला जाईल, असे खंडपीठाने स्पष्ट केले आहे. महामार्गापासून ५०० मीटरपर्यंतची दारूची दुकाने बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने १५ डिसेंबर रोजी दिले होते. एक एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट केले होते. आता त्यात काही किरकोळ बदल करून त्यांची अंमलबजावणी करण्याचे न्यायालयाने सांगितले आहे.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search