Next
नाशिकमध्येही सायबर पोलीस ठाणे
BOI
Friday, March 31, 2017 | 06:45 PM
15 0 1
Share this article:

नाशिक : आजच्या वाढत्या माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक जण अपडेट राहण्याचा प्रयत्न करत आहे. काही जण या तंत्रज्ञानाचा गैरवापर करत असल्याचेही आपण पाहतो. त्यातूनच सायबर गुन्हे वाढत चालले आहेत. हे वाढते प्रमाण लक्षात घेता, मुंबई आणि पुण्याप्रमाणे आता नाशिकमध्येही स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे सुरू करण्यात येणार आहे. 

नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंघल यांनी ही माहिती दिली आहे. शहरातील आर्थिक फसवणुकीचे गुन्हे, त्याचबरोबर सोशल मीडियावरूनही होणाऱ्या गुन्ह्यांची संख्या वाढली आहे. हे गुन्हे कमी करण्याच्या उद्देशाने हे स्वतंत्र पोलीस ठाणे सुरू करणार असल्याचे सिंघल यांनी सांगितले आहे. ‘सीनिअर जर्नालिस्ट फोरम’सह पोलीस आयुक्तालयात झालेल्या बैठकीत सिंघल यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावे ळी कायदा व सुव्यवस्था, वाहतूक, सिग्नल यंत्रणा, गुन्हे आणि त्यांची उकल अशा विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

 
15 0 1
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search