Next
‘नॉरक्रीन वुमन’ भारतात उपलब्ध
प्रेस रिलीज
Monday, March 19, 2018 | 01:03 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड’ ही संशोधनाभिमुख, जागतिकदृष्ट्या नावाजलेली आधुनिक औषधोद्योग कंपनी असून, नुकतीच या कंपनीने ‘नॉरक्रीन वुमन’ या प्रसिद्ध उत्पादनाचे भारतात सादरीकरण करीत असल्याची घोषणा केली. 

महिलांमधील केसगळती थांबवून केस वाढण्याचे चक्र पूर्ववत करणारा, नॉरक्रीन वुमन हा जागतिक व्यासपीठावर कौतुकास पात्र ठरलेला, वैद्यकियदृष्ट्या सिद्ध झालेला ‘प्रोटिओग्लायकेन रिप्लेसमेंट फॉर्म्युला’ आहे. डेन्मार्क येथे मुख्य कार्यालय असलेल्या ‘फार्मा मेडिको’ या फर्मशी केलेल्या परवाना करारांतर्गत, ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स या कंपनीतर्फे भारतात नॉरक्रीन वुमन या उत्पादनाचे विशेष विपणन करण्यात येणार आहे.
 
अनेक वैज्ञानिक अभ्यासांती, नॉरक्रीन हा फॉर्म्युला सिद्ध झाला असून, जागतिक व्यासपीठावरील नियामक एजन्सींकडूनही या उत्पादनाचे कौतुक करण्यात आले आहे. केसगळतीच्या व्यवस्थापनासाठी युके आणि युरोपमध्ये वापरले जाणारे नॉरक्रीन हे प्रथम क्रमांकाचे उत्पादन असून, आता जगातल्या ४० हून अधिक देशांमध्ये हे सहज उपलब्ध आहे. नॉरक्रीन वुमन या उत्पादनात मारिलेक्स हा आगळावेगळा वैज्ञानिक फॉर्म्युला वापरण्यात आला असून, केसांमधील फॉलिकल विकासासाठी आवश्यक असलेल्या विशिष्ट प्रोटिओग्लायकेन्स (पीजी) या घटकाने तो युक्त आहे. यामुळे, केसांच्या वाढीचे चक्र पूर्ववत होऊन, त्याला पुरेसे सहाय्य व देखभाल पुरवली जाते.
 
ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सचे अध्यक्ष आणि भारत, मध्यपूर्व व आफ्रिका विभागाचे प्रमुख सुजेश वासुदेवन म्हणाले, ‘नॉरक्रीन वुमन हे उत्पादन भारतात सादर करताना ग्लेनमार्कला खूप आनंद होतो आहे. त्वचारोगशास्त्राच्या क्षेत्रात ग्लेनमार्क ही कंपनी चार दशकांहून अधिक काळ कार्यरत असून, भारतीय रुग्णांसाठी आजवर आम्ही अनेक जागतिक थेरपी भारतात आणल्या आहेत. नॉरक्रीन उत्पादनामुळे भारतीय महिलांना केसांची वाढ पूर्ववत होण्यास मदत होणार आहे. इतकेच नव्हे, तर त्यांचे केसवाढीचे चक्रही पूर्ववत होऊ शकते आणि फॉलिक्यूलर पातळीवरील केसांच्या सर्व समस्याही यामुळे दूर होऊ शकतात.’
 
ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सच्या विक्री व विपणन विभागाचे वरीष्ठ उपाध्यक्ष राजेश कपूर म्हणाले, ‘साठ टक्के महिलांना आयुष्याच्या एका ठराविक टप्प्यावर केसगळतीच्या समस्येला तोंड द्यावे लागते.  भारतात तर ९० दशलक्ष महिला केसगळतीच्या समस्येला सामोऱ्या जातात, असे अभ्यासांती दिसून येते. पुरूष व स्त्रियांचे केसगळतीचे प्रकार भिन्न असल्यामुळे, प्रोटिओग्लायकेन रिप्लेसमेंटच्या माध्यमातून महिलांच्या केसगळतीवर लक्ष केंद्रित करणारे नॉरक्रीन वुमन हे पहिले व वैशिष्ट्यपूर्ण उत्पादन ठरत आहे.’
 
नॉरक्रीन वुमन हे भारतातील कोअर प्रिस्क्रीप्शन उत्पादन असून देशातील सर्व त्वचारोग तज्ज्ञांकडे ग्लेनमार्कतर्फे याचे विपणन व प्रसार करण्यात येणार आहे. हे उत्पादन काही ठराविक औषधविक्रेते व आरोग्यसेवा पोर्टल्सवर उपलब्ध होणार आहे.
 
तणाव, प्रदूषण, काही वैद्यकीय आजार, प्रसुती, संप्रेरकांचे असंतुलन झाल्यामुळे झालेले काही आजार, काही औषधांचा वापर, आहारविषयक कमतरता, स्टायलिंग उत्पादनांचा वापर अशा अनेक कारणांमुळे केसांच्या वाढीचे चक्र बिघडते आणि महिलांमध्ये केसगळतीची समस्या उद्भवते. केसवाढीचे चक्र नियमित करून या सर्व समस्यांवर मात करण्याचे काम नॉरक्रीन वुमन हे उत्पादन करते. 

नॉरक्रीन वूमन हे उत्पादन गोळ्यांच्या स्वरुपात उपलब्ध असून, वैद्यकीय प्रक्रिया, हेअर स्प्रे आणि क्रीम्सपेक्षा ही थेरपी अधिक सोपी आहे. सहा महिने दररोज दोन वेळा या गोळ्या घेणे आवश्यक आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link