Next
‘वारी’तर्फे इलेक्ट्रिक वाहनांसाठी कस्टमाइज्ड सोलर मोड्युल्स
प्रेस रिलीज
Thursday, May 02, 2019 | 11:39 AM
15 0 0
Share this article:

पुणे : भारतातील आघाडीच्या सोलर पीव्ही उत्पादक व रूफ टॉप सेगमेंटमधील आघाडीची कंपनी असलेल्या ‘वारी एनर्जीज’ने इलेक्ट्रिक वाहनांसाठी कस्टमाइज्ड सोलर मोड्युल्स हे सोलर पॉवर सोल्युशन सादर केले आहेत. हे स्वदेशी मोड्युल्स भारतातील वाहतूक उद्योगासाठी तयार करण्यात आले असून, ते लवचिक, वजनाने कमी, टिकाऊ व अधिक कार्यक्षम आहेत. 

रेफ्रिजरेशनसारख्या सहाय्यक कार्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते, तेथे योग्य ठरणारे हे मोड्युल्स ‘वारी’तर्फे भारतातच विकसित केल्यामुळे ते किफायतशीर आहेत. बेर्गस्टॉर्म अ‍ॅंड मदर्सन सुमीशी यशस्वीरित्या सहयोग केल्यानंतर या उद्योगात क्रांती घडविण्यासाठी ‘वारी’ अशा अजून भागीदारांचा शोध आहे. शाश्‍वत व किफायतशीर असल्यामुळे परिवर्तनामध्ये सौर उर्जा ही महत्त्वाची भूमिका बजावेल. याची संकल्पना २०१९मधील अंतरिम अर्थसंकल्पात वित्तीय मंत्र्यांनी ट्रान्सपोर्ट उद्योगामध्ये परिवर्तन घडवून जगात अग्रणी स्थान मिळविण्याच्या भारताच्या ध्येयाशी सुसंगत अशी ही संकल्पना आहे. या उद्योगात आघाडीची कंपनी म्हणून इलेक्ट्रिक वाहनांसाठी हे मोड्युल्सचा विकसित करण्याची संकल्पना ‘वारी’ला समजली.

या विषयी बोलताना ‘वारी एनर्जीज’चे संचालक सुनील राठी म्हणाले, ‘वारी एनर्जीजने नेहमीच भारताला सौरश्रृत देशामध्ये परिवर्तित व जागतिक पातळीवर समतुल्य करण्याचे ध्येय बाळगले आहे. ‘वारी’च्या कस्टमाइज्ड सोलर मोड्युलसह भारतीय रस्त्यांवर नजिकच्या भविष्यात दिसणार्‍या इलेक्ट्रिकल वाहनांच्या गरजेची पूर्तता ‘वारी’ करेल. मोड्युल्सच्या टिकाऊपणा व लवचिकतेमुळे चांगले परिणाम अपेक्षित आहेत. यामुळे वाहनांना वारंवार चार्ज करणे कमी होईल व त्यामुळे हवामान बदल कमी करण्यासाठी योगदान मिळेल. या मोड्युल्समुळे १० ते २५ टक्के कार्यक्षमता वाढणे अपेक्षित आहे.’

‘‘वारी’च्या कस्टमाइज्ड मोड्युल्ससह ‘वारी एनर्जीज’ हे वाहतुकीकडे बघण्याचा भारतीयांचा दृष्टीकोन बदलण्यासाठी प्रयत्न करेल. हे मोड्युल्स सुरत येथील प्रकल्पात तयार केले जाणार असून, इलेक्ट्रिक वाहनांचा सध्याचा देखरेख खर्च कमी करण्याची आपली वचनपूर्ती करणार आहे. इलेक्ट्रिक वाहनांना साह्य करण्याबरोबरच हे पॅनल्स कमर्शियल व्हेइकल्सवरदेखील प्रस्थापित केले जाऊ शकतात. यामुळे प्रवास करताना चार्जिंग शक्य होईल व ऑटोमोबाइल उद्योगात एक नाविन्यपूर्ण सेवा ठरेल,’ असा विश्वास राठी यांनी व्यक्त केला.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search