Next
शीतगृह व्यवस्था अधिक मजबूत करण्याची गरज
‘एमसीसीआय’तर्फे आयोजित चर्चासत्रात तज्ज्ञांचा सूर
BOI
Friday, June 14, 2019 | 03:29 PM
15 0 0
Share this article:

खासदार रूपा गांगुली यांच्यासह अन्य मान्यवर

पुणे : ‘देशातील शीतगृह व्यवस्थेचे जाळे अधिक मजबूत आणि व्यावसायिक दृष्टीने अधिक सक्षम केल्यास भारतातील खाद्य प्रक्रिया क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडेल,’ असे मत महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध विभागाच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी मंगळवारी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरच्या वतीने आयोजित एक दिवसीय इंडिया कोल्ड चेन समिटमध्ये बोलताना व्यक्त केले. 

या वेळी ‘एमसीसीआयए’चे अध्यक्ष प्रदीप भार्गवा, ‘एसीआर प्रोजेक्ट कन्सल्टंट’चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक अरविंद सुरंगे, जय स्टोरेज सोल्युशन्सचे कार्यकारी व्यवस्थापक प्रेमळ कारेलिया, ‘एमसीसीआयए’च्या फूड प्रोसेसिंग कमिटीचे अध्यक्ष आनंद चोरडिया, ‘नाबार्ड’चे मुख्य सरव्यवस्थापक उदय शिरसाळकर, हरियाणातील ‘एनआयएफटीइएम’च्या  कुलगुरू डॉ. चिंदी वासुदेवाप्पा यांच्याबरोबरच विशेष अतिथी म्हणून अभिनेत्री आणि खासदार रूपा गांगुली आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी डॉ. दराडे म्हणाल्या, ‘भारताच्या एकूण खाद्य क्षेत्रापैकी ३२ टक्के वाटा हा खाद्य प्रक्रिया उद्योगाचा आहे. यामध्ये उच्च वृध्दी व व्यवसायाचे सामर्थ्य आहे; मात्र हे करत असताना अन्न सुरक्षा आणि स्वछतेबाबत सर्वोच्च मापदंडांचा अवलंब केला पाहिजे. सक्षम शीतगृह व्यवस्था हे खाद्य प्रक्रिया उद्योगासाठी खूप महत्त्वाचे ठरेल. सार्वजनिक व खासगी क्षेत्राने एकत्र येऊन कार्यक्षम शीतगृह तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक केली पाहिजे, ज्यामुळे खाद्यप्रक्रिया उद्योगाला मोठी चालना मिळेल.’

आनंद चोरडिया म्हणाले, ‘फळे व भाज्या व्यवसायामध्ये कोल्ड स्टोरेज अर्थात शीतगृह यंत्रणा सर्वांत महत्त्वाच्या घटकांपैकी एक असून, ती अधिक कार्यक्षम व किफायतशीर बनविण्याकरिता प्रयत्न झाले पाहिजेत.’ 

अरविंद सुरंगे म्हणाले, ‘कोल्ड स्टोरेज तंत्रज्ञानामध्ये गेल्या काही वर्षात आमूलाग्र बदल झाला असून, त्याची व्याप्ती वाढली आहे. जगात प्रस्थापित कोल्ड स्टोरेज क्षमता भारतात सर्वांत जास्त असून, अधिक प्रभावीपणे त्याचे व्यवस्थापन झाल्यास भारत हे रिजनल फूड स्टोरेज हब म्हणून पुढे येऊ शकते.’

‘नाबार्ड’चे मुख्य सरव्यवस्थापक उदय शिरसाळकर यांनी शीतगृह उद्योगाच्या सक्षमीकरणासाठी ‘नाबार्ड’तर्फे करण्यात येणाऱ्या विविध कामांबाबत माहिती दिली. 

खासदार रूपा गांगुली म्हणाल्या, ‘खाद्य प्रक्रिया उद्योगात जागरूकतेचा अभाव असल्यामुळे खाद्य उत्पादने हाताळताना सर्वोत्कृष्ट पध्दतींचा अवलंब केला जात नाही. त्यामुळे या संदर्भात प्रयत्न झाले पाहिजेत. पाण्यासारख्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य वापर करून, पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search