Next
पंढरपुरात झाली छायाचित्रकारांसाठी कार्यशाळा
छायाचित्रण दिनानिमित्त आयोजन
BOI
Friday, August 17, 2018 | 06:01 PM
15 0 0
Share this article:

सोलापूर : जागतिक छायाचित्रण दिनाचे (१९ ऑगस्ट) औचित्य साधून पंढरपूर येथील फोटोग्राफर विकास मंचाच्या वतीने छायाचित्रकारांसाठी निःशुल्क कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. पंढरपूर येथील ‘हॉटेल विठ्ठल इन’च्या हॉलमध्ये १४ ऑगस्ट रोजी झालेल्या या कार्यशाळेला पंढरपूर शहर व तालुक्यातील छायाचित्रकारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. ही कार्यशाळा ज्येष्ठ छायाचित्रकार शिवाजी तरळगट्टी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

या वेळी व्यासपीठावर सांगली येथील सनआर्ट स्टुडिओचे संचालक श्रीकांत बाहेती, सोनी कंपनीचे प्रीतिश म्हात्रे, अनुराग कंपनीचे अमित शहा, ज्येष्ठ छायाचित्रकार लालासाहेब खिस्ते, श्रीकांत लव्हेकर, विनायक देवकर आदी मान्यवर उपस्थित होते. जागतिक छायाचित्रण दिन अर्थात वर्ल्ड फोटोग्राफी डेच्या निमित्ताने पंढरपूर येथील फोटोग्राफर विकास मंचाच्या वतीने पंढरपूर शहर व सोलापूर जिल्ह्यातील छायाचित्रकारांसाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला जिल्ह्यातील छायाचित्रकारांचा मोठा प्रतिसाद मिळाला. 

‘छायाचित्रकार कायम अपडेट राहावेत, यासाठी पंढरपूर फोटोग्राफर विकास मंचाच्या वतीने आम्ही वेळोवेळी अशा कार्यक्रमांचे आयोजन करतो,’ असे बशीर शेख यांनी सांगितले. सांगलीच्या सनआर्ट स्टुडिओचे संचालक शरद सारडा यांनी ‘यापुढे छायाचित्रकारांनी व्यावसायिक कौशल्याबरोबरच आपल्या आरोग्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे,’ असे सांगितले. त्यांनी छायाचित्रकारांना ‘फायनान्स’बद्दलची माहिती दिली. दिवसभराच्या या निःशुल्क कार्यशाळेला आलेल्या छायाचित्रकारांसाठी चहा, नाष्टा व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यशाळेत फोटो एडिटिंग सॉफ्टवेअरविषयीची वेगवेगळी माहिती देण्यात आली. तसेच नवनवीन अत्याधुनिक कॅमेरे, लेन्सेस, अल्बम, फ्लॅश आदी साहित्यासह प्रात्यक्षिकेदेखील दाखविण्यात आली.

सनआर्ट स्टुडिओच्या वतीने छायाचित्रकारांना विविध प्रकारचे कॅमेरे हाताळायला देण्यात आले, तसेच त्यांची माहिती देण्यात आली. या वेळी जमलेल्या छायाचित्रकारांनी विविध प्रकारचे नवीन कॅमेरे व त्याच्या अन्य उपकरणांची खरेदीही केली. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी श्रीकांत लव्हेकर, विनायक देवकर, बशीर शेख, बापू कदम, अरविंद होवाळ, श्रीराम बडवे, संजय गुरव, राजू आंबिके, नागेश साळुंखे, हरि सरवदे, प्रवीण पुकाळे, कबीर देवकुळे, सचिन कुलकर्णी, नितीन घोडके, भगवान नाईकनवरे, उमेश झाडे आदींनी परिश्रम घेतले.

(सोबतचा व्हिडिओ पाहा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
बशीर मुन्ना शेख About
सर्व प्रथम आम्ही आपले मनापासून आभारी आहोत. आपन आमच्या कार्यक्रमाला चांगली प्रसिद्धि दिली त्या मुळे आम्हाला पण काम करती असताना एक प्रकारची ऊर्जा मिळाली आपन केलेल्या सहकार्य बद्दल धन्यवाद आभारी आहोत
0
0
Datta Bhosale ropale About
mast
0
0

Select Language
Share Link
 
Search