Next
ओएलएक्सच्या वेबवाइसचे अनावरण
प्रेस रिलीज
Wednesday, March 28, 2018 | 03:43 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘ओएलएक्स’ या भारतातल्या सर्वांत मोठ्या ऑनलाइन क्लासिफाईड मंचाने आपल्या ग्राहक सुरक्षा उपक्रमांतर्गत ‘ओएलएक्स वेबवाइस’या सुविधेचे अनावरण केले आहे. ऑनलाइन पद्धतीने वित्तव्यवहार करताना स्वतःचे संरक्षण कसे करावे, याबाबत वापरकर्त्यांना व ग्राहकांना जागरुक करण्यासाठी ही सुविधा सादर करण्यात आली आहे.  वेबवाईस या उपक्रमांतर्गत, उत्पादन अपडेट्स,वापरकर्त्यांसाठी सुरक्षा अधिसूचना, कायदे अंमलबजावणी अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली जागरुकता उपक्रम आणि ग्राहक सहाय्य उपक्रम अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून ऑनलाइन सुरक्षेला प्राधान्य देण्यात येणार आहे.

सध्या ओएलएक्सच्या मोबाइल अॅपवर मँडेटरी रजिस्ट्रेशन लॉग-इन, चॅट फर्स्ट इंटरअॅक्शन्स आणि हायपर-लोकल ब्राउझिंग ही खास फिचर्स देण्यात आली असून अनोळखी व्यक्तींसोबत चर्चा करण्यातली असुविधा या फिचर्समुळे कमी होते. कायदे अंमलबजावणी अधिकारी आणि नागरी समाज संस्थांसाठी विविध कार्यशाळांचे आयोजन करून सायबर गुन्ह्यांतील नवीन ट्रेंडस ओळखण्यासाठी तसेच, त्यांच्या चौकशीत मदत होईल अशी माहिती पुरवण्यासाठी ओएलएक्स इंडियाने पुढाकार घेतला आहे. २०१७-१८ या वर्षात ओएलएक्सतर्फे नोयडा, गुरुग्राम, बंगळुरू आणि अहमदाबाद येथे पोलिस दलाच्या सहाय्याने विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले असून, येत्या वित्तवर्षातही अन्य शहरांतील अधिकाधिक वापरकर्त्यांपर्यंत व अधिकाऱ्यापर्यंत पोहोचण्याचे ध्येय त्यांनी बाळगले आहे.
 
समाजमाध्यम वाहिन्यांच्या माध्यमातून, वापरकर्त्यांचे महत्त्वाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न ओएलएक्स करीत आहे. यासाठी आगाऊ पेमेंट्स न करणे, खरेदी वा विक्री करण्यासाठी समोरच्या व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणे भेटणे, समोरासमोर भेटून वित्तव्यवहार करणे आणि खरेदी करण्यापूर्वी उत्पादन तपासून पाहणे या काही महत्वाच्या टीप्स ओएलएक्सने ग्राहकांना दिल्या आहेत. ऑनलाइन व्यवहार करताना वापरकर्ते व त्यांचा पैसा सुरक्षित रहावा, यासाठी ओएलएक्सने वापरकर्त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. वेबवाइस या उपक्रमाचा एक भाग म्हणून, ओएलएक्सने समाज माध्यमांमध्ये सुरक्षाविषयक चार व्हिडिओज प्रसारित केले आहेत.
 
हा उपक्रम ऑफलाइनही यशस्वी करण्यासाठी, ओएलएक्सने ‘ट्रस्ट अँड सेफ्टी हेल्प सेंटर’ची स्थापना केली असून वापरकर्त्यांच्या विश्वासाला व सुरक्षेला तडा देणाऱ्या समस्यांबाबत कारवाई करण्यासाठी या केंद्रात तज्ज्ञ टीम नेमण्यात आली आहे. या हेल्पलाइनमुळे ग्राहकांना व्यवहारांतील फसवणूक, शंकास्पद जाहीराती, आगाऊ पेमेंट्स आदीशी संबंधित समस्यांवर मात करता येणार आहे. याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे, या सुविधेच्या माध्यमातून  काम करताना सुरक्षित राहण्यासाठी वापरकर्त्यांना खास सुरक्षा सूचनाही या टीमकडून दिल्या जाणार आहेत.  

ओएलएक्स इंडियाचे सीओओ इरविन प्रित सिंग आनंद म्हणाले, ‘ऑफलाइन गैरव्यवहारांप्रमाणेच ऑनलाइन गैरव्यवहारही आपल्या समाजाला आतून पोखरत असतात.  ही मोठी समस्या सोडवण्याची जबाबदारी एक समाज म्हणून आपली सगळ्यांचीच आहे. ग्राहकाभिमुख ब्रँड या नात्याने, ग्राहकांचा विश्वास आणि सुरक्षा हे दोन घटक कायमच आमच्या केंद्रस्थानी आहेत. आमच्या उत्पादनातला सातत्यपूर्ण विकास आणि ओएलएक्स वेबवाइससारख्या आमच्या जागरुकता उपक्रमांतून, आमच्या वापरकर्त्यांना सुरक्षित ऑनलाइन अनुभव घेण्याबाबत शिक्षित करणे हे आमचे ध्येय आहे.’

‘ट्रस्ट अॅण्ड सेफ्टी हेल्प सेंटर’शी जोडले जाण्यासाठी वापरकर्त्यांनी ९९९९१ ४०९९९या क्रमांकावर किंवा safety@ओएलएक्स.in  या इमेल आयडीवर संपर्क साधावा,’ असेही त्यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link