Next
पोया (पोळा)
BOI
Monday, August 21, 2017 | 04:30 PM
15 0 0
Share this article:


आज श्रावण अमावास्या. शेतकऱ्यांच्या अत्यंत जिवाभावाच्या असलेल्या बैलांचं पूजन करण्याचा आजचा दिवस म्हणजेच पोळा. त्या निमित्ताने आज ‘पोया (पोळा)’ ही बहिणाबाईंची कविता पाहू या आणि ‘कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता या सदराचा समारोप करू या...
..........
आला आला शेतकऱ्या
पोयाचा रे सन मोठा
हातीं घेईसन वाट्या
आतां शेंदूराले घोटा
आतां बांधा रे तोरनं
सजवा रे घरदार
करा आंघोयी बैलाच्या
लावा शिंगाले शेंदुर
लावा शेंदूर शिंगाले
शेंव्या घुंगराच्या लावा
गयामधीं बांधा जीला
घंट्या घुंगरू मिरवा
बांधा कवड्याचा गेठा
आंगावऱ्हे झूल छान
माथां रेसमाचे गोंडे
चारी पायांत पैंजन
उठा उठा बह्यनाई,
चुल्हे पेटवा पेटवा
आज बैलाले नीवद
पुरनाच्या पोया ठेवा
वढे नागर वखर
नहीं कष्टाले गनती
पीक शेतकऱ्या हातीं
याच्या जीवावर शेतीं
उभे कामाचे ढिगारे
बैल कामदार बंदा
याले कहीनाथे झूल
दानचाऱ्याचाज मिंधा
चुल्हा पेटवा पेटवा
उठा उठा आयाबाया
आज बैलाले खुराक
रांधा पुरनाच्या पोया
खाऊं द्या रे पोटभरी
होऊं द्यारे मगदूल
बशीसनी यायभरी
आज करूं या बागूल
आतां ऐक मनांतलं
माझं येळीचं सांगन
आज पोयाच्या सनाले
माझं येवढं मांगन
कसे बैल कुदाळता
आदाबादीची आवड
वझं शिंगाले बांधतां
बाशिंगाचं डोईजड
नका हेंडालूं बैलाले
माझं ऐका रे जरासं
व्हते आपली हाऊस
आन बैलाले तरास
आज पुंज रे बैलाले
फेडा उपकाराचं देनं
बैला, खरा तुझा सन
शेतकऱ्या तुझं रीन !
- बहिणाबाई चौधरी

(‘कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता’ या सदरात प्रसिद्ध झालेल्या सर्व कविता एकत्रितरीत्या https://goo.gl/G71cC9 या लिंकवर उपलब्ध आहेत.) 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Shobhana Tirthali About 17 Days ago
फारच सुंदर कविता.श्रावण कवितांचा समर्थक शेवट.
0
0
विशाल नाव्हेकर About 17 Days ago
ही कविता अहिराणी नाही. खानदेशात बोलल्या जाणाऱ्या वऱ्हाडीच्या तावडी ह्या बोलीभाषेतील आहे.
0
0
Madhuvanti Pethe About 44 Days ago
बहिणाबाई नी वर्णन केलेला हा बैलपोळा सण मी लहानपणी खानदेशातील आजोळी अनुभवला होता... तो डोळ्यासमोर उभा राहिला...
0
0

Select Language
Share Link
 
Search