Next
‘टीआयएफएफएएन’ स्पर्धेत कांदा कापणी यंत्र निर्मितीचे आव्हान
सात राज्यातील ३७ महाविद्यालये सहभागी
BOI
Thursday, November 01, 2018 | 03:09 PM
15 0 0
Share this article:

आयसीएआरच्या अॅग्रीकल्चर इंजिनीअरिंगचे प्रमुख यांच्या हस्ते ‘टीआयएफएएन’ स्पर्धेच्या पात्रता फेरीच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. डी. डी. पवार, नीलकंठ देवशेतवार, संजय निबंधे, डॉ. इंद्रा मणी, प्रकाश जोशी, प्रा. क्षीरसागर व संदीप महाजन आदी.

पुणे : ‘एसएई इंडिया ऑफ हायवे बोर्ड’तर्फे घेण्यात येणाऱ्या  देशव्यापी ‘टीआयएफएफएएन - २०१८’ अर्थात टेक्नाॅलॉजी इनोव्हेशन फोरम फॉर अॅग्रीकल्चरल नर्चरिंग या स्पर्धेत यंदा स्वंयचलित कांदा कापणी यंत्र विकसित करण्याचे आव्हान ठेवण्यात आले आहे. यासाठीची पात्रता फेरी नुकतीच पुण्यात महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) येथे पार पडली. या स्पर्धेत देशभरातील सात राज्यांमधील तब्बल ३७ अभियांत्रिकी व शेती अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. 

तरुणांनी शेतीशी संबंधित तंत्रज्ञान विकसित करण्याकडे वळावे आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा. याबरोबरच कृषी उत्पादनातील नूतनीकरणाला चालना मिळावी आणि त्यामुळे अल्प भूधारक शेतकऱ्यांना यांत्रिकीकरणाच्या मदतीने सक्षम होता यावे, हा या स्पर्धेमागील प्रमुख उद्देश आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून देशभरातील अभियांत्रिकी व शेती अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येते. 

आयसीएआरच्या अॅग्रीकल्चर इंजिनीअरिंगचे प्रमुख डॉ. इंद्रा मणी
इंडीयन सोसायटी ऑफ अॅग्रीकल्चर इंजिनीअरिंग व नवी दिल्ली आयसीएआरच्या अॅग्रीकल्चर इंजिनीअरिंगचे प्रमुख डॉ. इंद्रा मणी यांच्या हस्ते ‘टीआयएफएफएएन – २०१८’ स्पर्धेच्या पात्रता फेरीचे उद्घाटन झाले. या वेळी जॉन डीअर इंडियाचे सरव्यवस्थापक आणि ‘टीआयएफएफएएन – २०१८’चे समन्वयक संदीप महाजन, एसएई इंडियाच्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष संजय निबंधे, जॉन डिअर इंडियाच्या टेक्नॉलॉजी आणि लॅबचे प्रमुख नीलकंठ देवशेतवार, एमआयटीचे सहव्यवस्थापक प्रकाश जोशी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे सहयोगी कुलगुरू व रजिस्ट्रार डॉ. डी. डी. पवार, एसएई इंडिया ऑफ हायवे बोर्डचे सचिव महेश मसुरकर, कमिन्सचे अमोल वाघमोडे, एसएई इंडियाच्या पश्चिम विभागाचे सचिव नरहरी वाघ, उपसंचालक रमेश पसरीजा उपस्थित होते.

संदीप महाजन यांनी या वेळी ‘टीआयएफएफएएन – २०१८’चा आजपर्यंतचा प्रवास उपस्थितांसमोर मांडला. देशाच्या कृषी क्षेत्रातील वास्तविक जीवन व आव्हाने याबद्दल देखील त्यांनी मार्गदर्शन केले.  संजय निबंधे यांनी भविष्याचा विचार करीत काम करण्यासाठी आवश्यक गोष्टींचा अवलंब करण्यासंबंधी माहिती दिली.

डॉ. इंद्रा मणी यांनी ‘टीआयएफएफएएन – २०१८’च्या संकल्पनेचे कौतुक करीत देशातील शेतीची स्थिती बदलविण्यासाठी अधिकाधिक अभियांत्रिकी व शेती अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले.      

या पात्रता फेरीत पात्र ठरलेल्या विद्यार्थांना पुढील फेरीत जाण्याची संधी मिळणार असून, त्यांना सादरीकरण केलेल्या यंत्राची कल्पना सत्यात उतरविण्याची संधी मिळणार आहे. यासाठी लागणारी सर्व आर्थिक मदतदेखील पात्रता फेरीत समाविष्ट झालेल्या संघांना करण्यात येणार असून, यामधून सर्वोत्तम तंत्रज्ञानाची निवड करण्यात येईल. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 47 Days ago
What was the outcome of the event ? Anything to show ?
0
0

Select Language
Share Link
 
Search