Next
निवडणूक आयोगाने घेतला महाराष्ट्रातील तयारीचा आढावा
BOI
Wednesday, February 27, 2019 | 02:24 PM
15 0 0
Share this story

मुंबई : आगामी लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील निवडणूक तयारीचा जिल्हानिहाय आढावा केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त अशोक लवासा आणि सुशील चंद्रा यांनी घेतला. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे मंगळवारी, २६ फेब्रुवारी रोजी निवडणूक आयुक्त अशोक लवासा आणि सुशील चंद्रा यांनी राज्यातील यंत्रणांच्या बैठका घेऊन निवडणूक तयारीचा आढावा घेतला.

 उप निवडणूक आयुक्त सुदीप जैन, उप निवडणूक आयुक्त चंद्रभूषण, महासंचालक (व्यय) दिलीप शर्मा, तसेच राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार या वेळी उपस्थित होते. 

आयोगाने राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस उप महानिरीक्षक, पोलीस आयुक्त, जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्याकडून जिल्हानिहाय आढावा घेतला. आयोगाने जिल्हानिहाय मतदान केंद्रावरील पाणी, वीज,शौचालयाची सुविधा, दिव्यांगांसाठी रॅम्प, व्हीलचेअर आदी सुविधांचा आढावा घेऊन विविध सूचना दिल्या.

 केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त अशोक लवासा आणि सुशील चंद्राइलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (इव्हीएम), व्हीव्हीपॅटची उपलब्धता नियमानुसार राहील याची दक्षता घ्यावी. व्हीव्हीपॅट जागृती अभियान नियमितपणे राबवावे. ,सी-व्हिजील, मोबाइल ॲप तसेच ‘मतदार हेल्पलाईन क्रमांक-१९५० याबाबत जागृती करावी. मतदार यादीत नावे समाविष्ट करण्याबाबत आलेल्या प्रत्येक अर्जावर कार्यवाही करावी. केलेल्या कार्यवाहीची माहिती डॅशबोर्डवर भरावी, आदी सूचना त्यांनी केल्या.

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विशेषतः गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत कमी मतदान झालेल्या मतदार संघात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी उपाययोजना कराव्यात. मतदार जागृतीचा कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा. महिला मतदार नोंदणी व मतदान टक्केवारीत वाढ व्हावी यासाठी प्रयत्न करावेत. या वर्षी आयोगाने दिव्यांग मतदारांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. दिव्यांग मतदारांची नोंदणी, तसेच त्यांना मतदान केंद्रावर घेऊन जाणे व परत सोडण्याची व्यवस्था निवडणूक प्रशासनाने करायची आहे.

निवडणूक आयुक्त अशोक लवासा
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेताना गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींवर लक्ष ठेवावे, तडीपार प्रकरणे, फरार गुन्हेगार यांच्याबाबत नियमित कारवाई सुरू ठेवावी. अजामीनपात्र वॉरंटचा आढावा घ्यावा. शस्त्र परवान्याचा आढावा घेऊन शस्त्र जमा करून घ्यावेत. अवैध शस्त्रांचा वापर होणार नाही यासाठी दक्षता घ्यावी. सामाजिक सौहार्द अबाधित राखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, आदी सूचना केल्या.

निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा
आयोगाकडून दिल्या जाणाऱ्या निर्देशांकडे लक्ष ठेऊन त्यांचे काटेकोर पालन होईल याची दक्षता घ्यावी. प्रत्येक जिल्ह्यात राजकीय पक्षांशी बैठक घेऊन त्यांच्या सूचना, प्रश्न जाणून घ्यावेत. संवेदनशील मतदान केंद्रानिश्चिती काळजीपूर्वक करावी. दूरसंचार सुविधांची उपलब्धता नसलेल्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था निर्माण करावी, असेही निर्देश या वेळी देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी आपापल्या जिल्ह्याच्या तयारीबाबत सादरीकरण केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link