Next
‘नौशाद अली-मजरूह सुलतानपुरी’ जन्मशताब्दीनिमित्त विशेष कार्यक्रम
‘तू ही नजरों में... तू ही नजारों में’तून जागवल्या नौशाद अली व मजरूह सुलतानपुरींच्या आठवणी
BOI
Monday, February 11, 2019 | 05:15 PM
15 0 0
Share this article:


पुणे : ‘तेरी बिंदिया रे...’, ‘होठो में ऐसी बात...’, ‘ऐसे न मुझे तुम..., ‘नैन लडजै...’, ‘लेकर हम दिवाना दिल...’, ‘गुम है किसीं के...’ अशा एक से बढकर एक गीतांच्या सादरीकरणामुळे ‘तू ही नजरों में... तू ही नजारों में’तून नौशाद अली-मजरूह सुलतानपुरींच्या आठवणी जागवल्या गेल्या. 

गायक जितेंद्र अभ्यंकर, अली हुसेन, गायिका मनीषा निश्चल, भाग्यश्री अभ्यंकर यांच्या बहारदार गायनाने यशवंतराव चव्हाण नाट्यगृह ‘नौशाद-मजरूह’मय झाले. निमित्त होते प्रसिद्ध संगीतकार नौशाद अली आणि गीतकार मजरूह सुलतानपुरी यांच्या जन्मशताब्दी वर्ष कार्यक्रमाचे. ‘स्वरस्वती’, ‘अंतर्नाद’ आणि ‘महक’ या संस्थांच्या वतीने ‘तू ही नजरों में... तू ही नजारों में’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

मनीषा निश्चलपूर्वार्धात १६ आणि उत्तरार्धात १३ गाण्यांच्या मैफलीने रसिक मंत्रमुग्ध झाले. मजरूह सुलतानपुरी आणि नौशाद यांनी अजरामर केलेल्या या गीतांना रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली. मनीषा निश्चल, जितेंद्र अभ्यंकर यांच्यासह भाग्यश्री अभ्यंकर व अली हुसेन यांनी गाणी सादर केली. केदार परांजपे यांनी लयबद्ध संगीत संयोजन केले. सुलभा तेरणीकर यांच्या आशयपूर्ण निवेदनाने नौशाद-मजरूह यांना प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी रसिकांना मिळाली. 

प्रसाद गोंदकर (सतार), रमाकांत परांजपे (व्हायोलिन), विक्रम भट, केदार मोरे (ढोलकी), अभिजित भदे, विशाल थेलकर, विजू मूर्ती, दर्शना जोग, निलेश देशपांडे व बाबा खान यांनी साथसंगत केली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search