Next
नाशिक ते पंढरपूर सायकल वारी; सातशे सायकलिस्ट होणार सहभागी
उपक्रमाचे आठवे वर्ष; कॅन्सर आणि बाललैंगिक अत्याचाराबाबत यंदा करणार जनजागृती
BOI
Wednesday, June 19, 2019 | 05:44 PM
15 0 0
Share this article:नाशिक :
नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनने आषाढी एकादशीनिमित्त नाशिक ते पंढरपूर अशी सायकल वारी आयोजित केली आहे. २८ ते ३० जूनदरम्यान होणार असलेल्या या सायकल वारीतून कॅन्सर व लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार या विषयांवर जनजागृती करण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यातील आठ ते ७३ वयोगटातील सातशे महिला आणि पुरुष सायकलिस्ट या वारीमध्ये सहभागी होणार आहेत. सायकल वारीचे हे आठवे वर्ष आहे.

शिक्षण, साहित्य-संस्कृती, आरोग्य, सामाजिक एकता या विषयांवर जागृती हे या वारीचे वैशिष्ट्य आहे. नाशिक ते पंढरपूरदरम्यान या दरम्यान लागणाऱ्या अनेक गावांमध्ये या वारीत जनजागृती केली जाते. आयपीएस अधिकारी हरीश बैजल यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या सायकल वारीतून दर वर्षी सामाजिक संदेश दिला जातो.

केवळ तीन दिवसांत पर्यावरणपूरक वारी करण्याची संधी या वारकऱ्यांना सायकल वारीच्या माध्यमातून उपलब्ध झाली असून, व्यायाम, आरोग्य, पर्यावरणाचे सान्निध्य आणि अध्यात्म असे अनेक फायदे यातून होणार आहेत. आठ वर्षांच्या मुलापासून ७३ वर्षांच्या आजोबांपर्यंत विविध वयोगटांतील नागरिक या सायकल वारीमध्ये नाशिक ते पंढरपूर सायकलवरून प्रवास करतात. यामध्ये महिला, युवती, युवक यांची संख्याही लक्षणीय असते. वकील, डॉक्टर, इंजिनीअर, प्राध्यापक, उद्योजक, पत्रकार, लेखक, कवी, साहित्यिक, वास्तुविशारद, पोलीस अधिकारी, खेळाडू, गृहिणी याच्यासह शेतकरीही या सायकल वारीत मोठ्या भक्तिभावाने सहभागी होतात. सध्या सर्व सायकलिस्ट सायकलिंगचा सराव करत आहेत. रोज दहा ते पंधरा किलोमीटर सायकलिंग केले जात आहे.

प्रवीण खाबिया‘सायकल हा नाशिकचा ब्रँड होत आहे. दर वर्षीप्रमाणे याही वर्षी एक वेगळा सामाजिक संदेश देण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील सायकल वारकरी वारीत सहभागी होणार आहेत. शिक्षण, आरोग्य, संस्कृती, अध्यात्म आणि सामाजिक एकता यांबद्दलचा संदेश या वारीतून प्रत्येक वर्षी मिळत असून, सर्व जातिधर्मांचे सायकलिस्ट या वारीत मोठ्या भक्तिभावाने सहभागी होत असतात,’ अशी प्रतिक्रिया नाशिकच्या सायकलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण खाबिया यांनी व्यक्त केली आहे. 

असा असेल प्रवास - 
पहिला दिवस - 
२८ जून रोजी सकाळी सहा वाजता गोल्फ क्लब ग्राउंड येथून वारीला सुरुवात होणार आहे. तेथून सिन्नर, नान्नज, राहुरी मार्गे वारी थेट १६० किलोमीटरवर अहमदनगर शहरात मुक्कामी थांबणार आहे. 

दुसरा दिवस - 
दुसऱ्या टप्प्यात सायकल वारी रुई छत्तिसी, करमाळामार्गे जाऊन टेंभुर्णी येथे मुक्कामी येईल. दुसरा टप्पा १४० किलोमीटरचा असेल. 

तिसरा दिवस -
टेंभुर्णीहून निघाल्यावर सायकलिस्ट करणार साठ किलोमीटरचा प्रवास करून दुपारी बारा वाजेपर्यंत पंढरपुरात दाखल होणार आहेत. या ठिकाणी दर्शन घेऊन सायकलिस्ट नाशिकला परतणार आहेत.

सायकलचे रिंगणही
गेल्या दोन वर्षांपासून सायकल रिंगण घालण्याचा यशस्वी प्रयोग यंदाही आणखी मोठ्या स्वरूपात होणार आहे. पंढरपूरजवळच्या खेडलेकर महाराज आश्रमाच्या मैदानात हे सायकल रिंगण घालण्यात येणार आहे. हे अनुभवण्याचे कुतुहल वारीमध्ये सहभागी होणाऱ्या सायकलिस्टमध्ये  आहे.

सायकल वारीची वैशिष्ट्ये 
- कॅन्सर आणि लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराबाबत करणार जनजागृती
- शून्य कचरा, शून्य प्लास्टिक
- खेडलेकर महाराज पटांगणात सायकल रिंगण
- आठ ते ७३ वयोगटातील वारकरी सहभागी
- नाशिक जिल्ह्यासह मुंबई, पुणे, ठाणे, पुणे शहरातून येणार सायकल वारी
- तत्पर वैद्यकीय व्यवस्था.
- महिलांची संख्या लक्षणीय. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
वंदना About 117 Days ago
फारच छान उपक्रम...महिलांची लक्षणीय संख्या आहे हे वाचुन आनंद झाला😊
0
0

Select Language
Share Link
 
Search