Next
मोहिते महाविद्यालयात रानभाज्या महोत्सव
जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजन
मिलिंद जाधव
Friday, August 10 | 06:04 PM
15 0 0
Share this story

खोडाळा : कल्याणच्या गिरीवासी सेवा मंडळातर्फे चालवले जात असलेले ठाण्याच्या मोखाडा तालुक्यातील खोडाळा येथील नानाजी मोहिते गुरुजी कला, वाणिज्य व बी. एम. एस. महाविद्यालय आणि जोगलवाडी येथील मातोश्री यशोदाबाई मुरलीधर मोहिते कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय या आदिवासी भागांतील महाविद्यालयात जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने रानभाज्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. तसेच शेतीच्या अवजारांचेही प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. 

आदिवासी संस्कृती, चाली-रीती, तसेच आदिवासी साहित्यावर असलेल्या ग्रंथांचे प्रदर्शनही या वेळी भरवण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी इतिहास विभागाचे प्रमुख प्रा. हेमंत भोये यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य सुधाकर गवंदे, प्रा. प्रवर्तन काशिद, प्रा. दीपक कडलग, प्रा. आर. व्ही. मोरे, डॉ. सुरेंद्र खाडे आदींनी या वेळी आपले मनोगत व्यक्त केले. सूरज जोशी, संजय गार या विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत उपस्थित होते.  

राज्यभाषा महोत्सव आणि प्रदर्शनाचे हे पाचवे वर्ष असून, आदिवासी संस्कृतीचे प्रदर्शन महाविद्यालयातर्फे आयोजित केले जात असते, असे शिक्षकांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक नवनाथ शिंगवे यांनी केले, तर आभार सरिता तांबे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link