Next
ठाणे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्यपदी शिवसेनेचे प्रकाश भोईर
BOI
Thursday, October 04, 2018 | 04:51 PM
15 0 0
Share this article:

प्रकाश भोईरभिवंडी : भिवंडी पंचायत समितीमधील सदस्य व माजी उपसभापती प्रकाश भोईर यांची ठाणे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्यपदी निवड करण्यात आल्याने सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची अधिसूचना व शासन निर्णयातील तरतुदीनुसार ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी भोईर यांची निवड केली. ठाणे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्य म्हणून त्यांची निवड केली असल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना दिले. भोईर शिवसेना ओबीसी सेलचे भिवंडी तालुकाध्यक्ष असून, पंचायत समिती सदस्यही आहेत. त्यांच्या निवडीसाठी महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे अध्यक्ष व शिवसेना ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील व ठाणे जिल्हा परिषद अध्यक्षा मंजूषा जाधव यांनीही प्रयत्न केले होते. भोईर यांना निवडीचे पत्र मिळाल्याचे समजताच आमदार शांताराम मोरे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक डॉ. संजय पाटील, विलास पाटील, युवा सेना सचिव योगेश पाटील, मजूर फेडरेशन संचालक पंडित पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप भोईर यांनी त्यांचे अभिनंदन केले.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search