Next
सुहासिनी इर्लेकर
BOI
Saturday, February 17 | 03:45 AM
15 0 0
Share this story

‘पारिजातकाच्या तळी, गेले हसुनिया कोण? परिमळली पहाट? की हा लालस श्रावण?’ असं लिहिणाऱ्या कवयित्री आणि लेखिका सुहासिनी यशवंत इर्लेकर यांचा १७ फेब्रुवारी हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
.....
१७ फेब्रुवारी १९३२ रोजी सोलापूरमध्ये जन्मलेल्या सुहासिनी यशवंत इर्लेकर या कथाकार, कादंबरीकार, बालसाहित्यकार आणि कवयित्री म्हणून प्रसिद्ध होत्या. त्यांनी समीक्षणात्मक लेखनसुद्धा केलं आहे. संत साहित्याचा त्यांचा गाढा अभ्यास होता. 

त्यांची मौन जांभळ्या क्षणी ही कविता –

ह्या मौन जांभळ्या क्षणी
पाझरणाऱ्या सावल्या
गूढ फेऱ्यांनी नाचत असता
नको विचारूस
असा व्याकुळ स्वरात
संपलेल्या प्रवासाच्या
न संपणाऱ्या कथा
कोण आलं भेटीला –
सांगत जन्मांतरीचं हळवं नातं?
नि कोण पाठ वळताच
होत गेलं अनोळखी –
असून रक्ताच्याच नात्याचं?
कशा ओलांडल्या दऱ्या गूढ
खेचतच राहणाऱ्या क्षणोक्षणी?
नि कसे चढले घाट
भिवविणारे निसरडे जीवघेणे?
कशी रास रचून झाडांनी
गुंफली
ममताळू रेशीमगाणी?

आई! ती माझी आई, आकाशाच्या अभिप्रायार्थ, चित्रांगण, महदंबेचे धवले, नाथांचे रुक्मिणी स्वयंवर, आद्य मराठी आत्मचरित्रकार संत नामदेव, आजी आणि शेन वॉर्न, भगवान गौतम बुद्ध, बुद्ध चरित गाऊ या, गुरू-शिष्यसंवाद आणि समाधी संकल्पना, ह्या मौन जांभळ्या क्षणी, जनाबाईंचे निवडक अभंग, मुक्तीकडून मुक्तीकडे, नामदेवकृत ज्ञानेश्वर चरित्र, नाना फडणविसांचे आत्मचरित्र, नरेंद्रकृत आद्य मराठी महाकाव्य, साहित्य संवाद, संतसाहित्य - एक रूपवेध, स्फुट आणि अस्फुट अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

२८ ऑगस्ट २०१० रोजी त्यांचा बीडमध्ये मृत्यू झाला.

(सुहासिनी इर्लेकर यांची पुस्तकं बुकगंगा डॉट कॉमवरून घरपोच मिळवण्यासाठी येथे क्लिक करा).

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link