Next
‘सीसीआरएएस’च्या नियामक मंडळात डॉ. बेंडाळे
प्रेस रिलीज
Tuesday, July 31 | 04:48 PM
15 0 0
Share this story

डॉ.  योगेश बेंडाळेपुणे : केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयांतर्गत असलेल्या ‘सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्स’च्या (सीसीआरएएस) नियामक मंडळाच्या तज्ज्ञ सदस्यपदी डॉ.  योगेश नारायण बेंडाळे यांची निवड करण्यात आली आहे. ‘आयुष’चे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हे या मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष असून, देशभरातील निवडक तज्ज्ञांना या मंडळाचे सदस्यत्व देण्यात येते.

या निवडीबद्दल डॉ. बेंडाळे म्हणाले, ‘राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आयुर्वेदातील शास्त्रीय संशोधन सिद्ध करण्याचे, तसेच सरकारी व खासगी संशोधन संस्थांना तांत्रिक साहाय्य पुरविण्याचे काम ‘सीसीआरएएस’कडून केले जाते. केंद्र सरकारच्या औषधी वनस्पती मंडळाला त्याची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणि औषधनिर्माण उद्योगक्षेत्राला औषधे व प्रक्रियांवरील पेटंट मिळविण्यासाठी ‘सीसीआरएएस’कडून मदत केली जाते. आयुर्वेदाला आंतरराष्ट्रीय पातळीवर एक शाश्वत शास्त्र म्हणून मान्यता प्राप्त होण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link