Next
रत्नागिरीत पारंपरिक दहीहंडी उत्सवाची गोडी अजूनही टिकून
BOI
Tuesday, September 04 | 01:12 PM
15 0 0
Share this story

विठ्ठल मंदिरातील दहीहंडीधमालनीच्या पारावरील हंडीरत्नागिरी : पाच ते आठ थरांपर्यंतच्या मोठमोठ्या हंड्या रत्नागिरीसारख्या शहरात होऊ लागल्या आहेत; मात्र राधाकृष्ण मंदिर, विठ्ठल मंदिरात साजऱ्या होणाऱ्या पारंपरिक दहीहंडी उत्सवाची गोडी आजच्या आधुनिक युगातही टिकून आहे. मंदिरातील भोवत्या, पारंपरिक कृष्णनृत्य आणि तिसऱ्या थरावर हंडी फोडायची, विठ्ठल-रुक्मिणीला कृष्ण आणि राधेचं रूपं लावायचं, असा हा पारंपरिक उत्सव अजूनही साजरा केला जातो.

विठ्ठल-रुक्मिणीला कृष्ण-राधेची रूपं

सोमवारी (तीन सप्टेंबर) दहीकाल्याच्या दिवशी ‘मच गया शोर सारी नगरी रे,’ ‘गोविंदा आला रे आला, जरा मटकी संभाल ब्रिजबाला’ या जुन्या गाण्यांच्या ठेक्यावर तरुणाई थिरकली. शहरात पाच-सहा थरांच्या दहीहंड्या सुरू झाल्या असल्या, तरी विठ्ठल मंदिरातील पारंपरिक उत्सवाला प्रतिवर्षाप्रमाणे रत्नागिरीकरांची भरपूर गर्दी झाली. इथली हंडी फुटल्यावर शहरात अन्यत्र हंड्या फोडण्यात आल्या.

राधाकृष्णाच्या उत्सवातील विठ्ठलाची पालखी आणि रथ

गोकुळाष्टमीनिमित्त येथील विठ्ठल मंदिरात विठ्ठल-रुक्मिणीला कृष्ण-राधेची रूपं लावण्यात आली. विठ्ठल मंदिरात नटून थटून आलेल्या कृष्णाच्या वेषातील मुले व गोपिकांनी कृष्णगीतांवर नृत्ये सादर केली. त्यानंतर आरत्या, भजने म्हणत पाच भोवत्या घालण्यात आल्या. ‘एक, दोन तीन चार विठ्ठल मंदिरातील पोरं हुश्शार’ असे म्हणत मंदिरातील हंडी फोडण्यात आली. त्यानंतर दही-पोह्यांचा प्रसाद वाटण्यात आला.

गोखले नाका येथे हंडी फोडताना गोविंदा पथक आणि उत्सवासाठी झालेली गर्दी.

त्यानंतर गोखले नाका, राधाकृष्ण नाका, झारणी रोड, राम मंदिर या मार्गावरील हंड्या दुसऱ्या-तिसऱ्या थरावर फोडण्यात आला. या वेळी ‘गोविंदा रे गोपाळा’चा गजर करण्यात आला. गोखले नाक्यावरील हंडी प्रति वर्षीप्रमाणे गोपिकेने फोडली. या वेळी भाविकांची भरपूर गर्दी झाली होती. गुलालाची उधळण, ढोल-ताशांचा गजर करण्यात आला. कृष्णाचा सजवलेला लाकडी रथ ओढण्यासाठी भाविकांची गर्दी झाली.

(दहीहंडीच्या वेळच्या उत्साही वातावरणाची झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत...)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link