Next
‘व्यंग दबंग’ व्यंगचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन
प्रेस रिलीज
Saturday, March 24, 2018 | 12:28 PM
15 0 0
Share this storyपुणे :
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागातर्फे पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘व्यंग दबंग’ व्यंगचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध व्यंगचित्रकार वैजनाथ दुलंगे आणि जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांच्या हस्ते शनिवारी, २४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात झाले. 

या कार्यक्रमाला माजी महापौर प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काकडे, अण्णा थोरात, नगरसेवक रवींद्र माळवदकर, काका चव्हाण, नगरसेवक अश्विनी कदम, अशोक राठी, राष्ट्रवादी काँग्रेसची नेते मंडळी, तसेच व्यंगचित्रकार चारुहास पंडित, घनःश्याम देशमुख, चित्रपट निर्माते निलेश नवलाखा, तसेच मिस गुजरात सिद्धी त्रिवेदी आदी उपस्थित होते. हे प्रदर्शन रविवार, २५ मार्चपर्यंत सकाळी १० ते नऊ या वेळेत सुरू राहणार आहे, अशी माहिती सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील, संयोजक धनराज गरड यांनी दिली. योगेश कुचेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

प्रदर्शनातील एक व्यंगचित्रया प्रदर्शनात वैजनाथ दुलंगे, प्रदीप म्हापसेकर, आलोक निरंतर, राजेंद्र सरग, कपिल घोलप, धनराज गरड, अतुल पुरंदरे, शरयू परतांडे, योगेंद्र भगत, संजय मोरे, रणजित देवकुळे, भटू बागले, गौरव यादव, लहू काळे अशा अनेक व्यंगचित्रकारांची व्यंगचित्रे मांडण्यात आली आहेत.

‘व्यंगचित्र हा एक आरसा असतो. समाजातील घडामोडींचे प्रतिबिंब त्यात पडत असते. व्यंगचित्र याच्या किंवा त्याच्या विरोधात असतात असे समजता कामा नये. सध्याची परिस्थिती पाहता व्यंगचित्रकलेला खरेखुरे ‘चांगले दिवस’ येताना दिसत आहेत,’ असे प्रतिपादन वैजनाथ दुलंगे यांनी केले. ‘राष्ट्रवादी काँग्रेसचा सांस्कृतिक विभाग चांगले उपक्रम घेऊन पुढे येत आहे,’ असे उद्गार रोहित पवार यांनी काढले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link