Next
‘अमलताश’ चित्रपटाची ‘मामि’ महोत्सवासाठी निवड
गायक राहुल देशपांडे मुख्य भूमिकेत
BOI
Monday, October 22 | 04:29 PM
15 0 0
Share this story

पुणे : गायक राहुल देशपांडे यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘अमलताश’ या पहिल्या चित्रपटाची निवड आगामी ‘मामि’ चित्रपट महोत्सवासाठी झाली आहे. 

शास्त्रीय गायन मैफल, संगीत नाटक यानंतर आता राहुल देशपांडे या चित्रपटाच्या माध्यमातून रूपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटात त्यांच्यासोबत त्यांची बहीण दीप्ती माटेदेखील झळकणार आहेत.

राहुल देशपांडे यांनी याआधी बालगंधर्व, पुष्पक विमान या दोन चित्रपटात कॅमिओ भूमिका साकारल्या आहेत. मात्र मुख्य भूमिकेत ते प्रथमच या चित्रपटात झळकणार आहेत. कलाकाराच्या आयुष्याभोवती फिरणारा हा चित्रपट असून, यात राहुल देशपांडेंबरोबर पल्लवी परांजपे या मुख्य भूमिकेत असणार आहेत. याशिवाय प्रतिभा पाध्ये, दीप्ती माटे, त्रिशा कुंटे यादेखील चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत. याची कथा सुहास देसले यांची असून, त्यांनीच चित्रपटाचे दिग्दर्शनदेखील केले आहे. भूषण माटे यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे.         
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link