Next
रेडिओ संस्कृत भारती; जगातील पहिला संस्कृत इंटरनेट रेडिओ सुरू
‘खांडबहाले डॉट कॉम’चा उपक्रम; २४ तास प्रसारण
BOI
Friday, August 16, 2019 | 05:03 PM
15 0 0
Share this article:

नाशिक : गीर्वाणवाणी अर्थात देवभाषा संस्कृत शिकण्यात रस घेणाऱ्यांची संख्या अलीकडे वाढत चालली आहे. श्रवण हा भाषाशिक्षणातील सर्वांत महत्त्वाचा घटक असतो. ही गोष्ट लक्षात घेऊन १६ ऑगस्ट २०१९ रोजी ‘रेडिओ संस्कृत भारती’ या जगातील पहिल्या संस्कृत इंटरनेट रेडिओचे मोफत प्रसारण सुरू करण्यात आले आहे. विविध भाषांचे शब्दकोश ऑनलाइन उपलब्ध करून देणारे सुनील खांडबहाले यांच्या ‘खांडबहाले डॉट कॉम’तर्फे हा उपक्रम राबवण्यात आला आहे. यासाठी कोणतेही सॉफ्टवेअर किंवा अॅप इन्स्टॉल करावे लागत नाही.

श्रावण पौर्णिमेला जागतिक संस्कृत दिन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून १६ ऑगस्ट रोजी ‘रेडिओ संस्कृत भारती’चे प्रसारण सुरू केल्याची माहिती सुनील खांडबहाले यांनी दिली. संस्कृत भाषेचे संवर्धन आणि प्रचार-प्रसारणार्थ हा उपक्रम सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. (हा रेडिओ ऐकण्यासाठीच्या लिंक्स बातमीच्या शेवटी दिल्या आहेत.)

श्रवण हे भाषा शिकण्याचे पहिले आणि अत्यंत प्रभावी माध्यम असते. कोणतीही भाषा सतत कानावर पडल्याने त्या भाषेचे शब्द, उच्चार, उच्चारणाची पद्धत, व्याकरण यांचे नकळत आकलन होते आणि हळूहळू ती भाषा आपसूकच ओठावर येते. संस्कृत भाषाही त्याला अपवाद नाही. संस्कृत शिकण्याची इच्छा अनेकांना असते. परंतु सोयीनुसार आणि पूर्णवेळ संस्कृत श्रवण करता येऊ शकेल असे व्यासपीठ इंटरनेट जगतात उपलब्ध नाही, असे लक्षात आल्यावर नाशिकमधील खांडबहाले डॉट कॉम या संस्थेने यासाठी पुढाकार घेतला. ही संस्था भारतीय भाषा व तंत्रज्ञान-विकास संस्था म्हणून कार्यरत आहे. ‘२४ बाय ७’ म्हणजे आठवड्याचे सातही दिवस, २४ तास सुरू राहणाऱ्या ‘रेडिओ संस्कृत भारती’ या इंटरनेट रेडिओचे प्रसारण संस्थेने १६ ऑगस्टपासून सुरू केले. 

सुनील खांडबहालेसंस्थेचे संचालक सुनील खांडबहाले म्हणाले, ‘मी संस्कृत भारतीचा विद्यार्थी आहे. संस्कृत भाषेचे अध्ययन करत असताना संस्कृत भाषा कानावर पडत होती. परंतु एकदा वर्गाबाहेर पडले, की संस्कृतश्रवण दुर्मीळ होते. संस्कृत स्तोत्रे, श्लोक, गीते अनेक वेबसाइट्सवर उपलब्ध आहेत; मात्र ती एकत्रित नाहीत. तसेच, व्यावहारिक जीवनाशी संबंध असणारे संवादात्मक संस्कृत अध्ययनपूरक साहित्य संपादित-संकलित करणे आणि २४ तास अव्याहतपणे श्रवण करता येऊ शकेल इतके सुसह्य करणे गरजेचे असल्याचे प्रकर्षाने जाणवले. त्यामुळे खरे तर स्वतःसाठी संस्कृत-संभाषण शिकण्याचे साधन म्हणून मी इंटरनेट रेडिओ विकसित केला. पुढे अनेकांच्या आग्रहास्तव आणि सहभागातून संस्कृत इंटरनेट रेडिओला मूर्त रूप देण्यात आले.’

यामध्ये संस्कृत भाषेतून विविध प्रसंगानुरूप संवाद-संभाषणे (म्हणजे शिक्षक-विद्यार्थी संवाद, पालक-पाल्य संवाद, मित्र-संवाद, शाळा, कार्यालय, दवाखाना आदी प्रसंग-संवाद), विषयवार धडे, व्याकरण पाठ, शब्दसंग्रह, दैनंदिन जीवनातील वस्तू-संबंध, लघुकथा-बोधकथा, गीते, कविता, सुभाषिते असा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. जगभरातील व्यापक लोकसहभागातून प्रसारित केला जाणारा इंटरनेटवरील हा पहिला कम्युनिटी रेडिओ आहे. 

हा रेडिओ ऐकण्यासाठी कोणतेही सॉफ्टवेअर अथवा अॅप डाउनलोड किंवा इंस्टॉल करावे लागत नाही. आपले दैनंदिन काम करता-करता स्मार्टफोन, टॅबलेट, तसेच संगणकावर संस्कृत इंटरनेट रेडिओ ऐकता येतो.

‘सर्वसमावेशक व दर्जेदार कार्यक्रमांच्या निर्मितीसाठी जगभरातील संस्कृतप्रेमी यात आपले योगदान देऊ शकतील व अभिव्यक्त होऊ शकतील अशी योजना आहे,’ असे सुनील खांडबहाले यांनी सांगितले. त्यासाठी विषयतज्ज्ञ आणि संस्कृतप्रेमींनी आपल्या सूचना जरूर पाठवाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

संस्कृत रेडिओ ऐकण्यासाठी लिंक्स :
https://tinyurl.com/sanskritradio

(सुनील खांडबहाले यांची प्रेरणादायी गोष्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

हेही जरूर वाचा : 

‘संस्कृत भाषेला मरण नाही’

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Yogendrasingh Shivaji Patil About 44 Days ago
अतिशय सुंदर भारतीय संस्कृतीची व संस्ककृ भाषेतुन नितीमूल्यांची शिकवण देणारी व सहज समजणारी रेडीओ वाहीनीद्वारे सामान्य माणसाबरोबर पोहचवणारी श्राव्य वाहीनी सुरू केल्याबद्दल श्री.खांडबहाले सरांचे हार्दीक आभार.
0
0
Yogendrasingh Shivaji Patil About 44 Days ago
अतिशय सुंदर भारतीय संस्कृतीची व संस्ककृ भाषेतुन नितीमूल्यांची शिकवण देणारी व सहज समजणारी रेडीओ वाहीनीद्वारे सामान्य माणसाबरोबर पोहचवणारी श्राव्य वाहीनी सुरू केल्याबद्दल श्री.खांडबहाले सरांचे हार्दीक आभार.
0
0
Yogendrasingh Shivaji Patil About 44 Days ago
अतिशय सुंदर भारतीय संस्कृतीची व संस्ककृ भाषेतुन नितीमूल्यांची शिकवण देणारी व सहज समजणारी रेडीओ वाहीनीद्वारे सामान्य माणसाबरोबर पोहचवणारी श्राव्य वाहीनी सुरू केल्याबद्दल श्री.खांडबहाले सरांचे हार्दीक आभार.
0
0
Yogendrasingh Shivaji Patil About 44 Days ago
अतिशय सुंदर भारतीय संस्कृतीची व संस्ककृ भाषेतुन नितीमूल्यांची शिकवण देणारी व सहज समजणारी रेडीओ वाहीनीद्वारे सामान्य माणसाबरोबर पोहचवणारी श्राव्य वाहीनी सुरू केल्याबद्दल श्री.खांडबहाले सरांचे हार्दीक आभार.
0
0
योगेश देवकुटे About 53 Days ago
खुप खुप स्तुत्य उपक्रम.अभिनंदन मनापासून शुभेच्छा.
0
0
Sudhakar R Kulkarni About 56 Days ago
मला संस्कृत भाषेची आवड आहे, ती संस्कृत रेडिओ ने पुरी होईल.
0
0
Sanjay Thigle About 57 Days ago
अभिनंदनीय उपक्रम! अशा प्रकारे आपण जी उणीव होती ती छान भरुन काढली आहे. संस्कृत प्रसारासाठी नक्कीच हातभार लागेल. धन्यवाद! संजय थिगळे, कल्याण
0
0
Kiran parmar About 58 Days ago
Ati UTTAM karyam.... Sanskrit bhasha.. Abhinanadana... Congratulations for Bigginers it is very good startup...
0
0
Swami About 58 Days ago
Hats off.. to the great work. thank you for story. I am playing this radio in my class for all students
0
0
योगेश अंबादास देवकुटे About 58 Days ago
खुप स्तुत्य उपक्रम. प्रेरणादायी पण..सर्व भाषांची जननी असलेल्या संस्कृत भाषेला . यामुळे पुनरूज्जीवन मिळण्यास सहाय्य होईल. आणि संस्कृत प्रेमीव्यक्तींना सहजरीत्या संस्कृत अभ्यास होईल.मनापासून धन्यवाद.
0
0
anjaliraje1966@gmail.com About 58 Days ago
Good
0
0

Select Language
Share Link
 
Search