Next
देव अजब गारोडी
BOI
Saturday, August 05, 2017 | 05:12 PM
15 0 0
Share this article:

आला पिकाले बहार, झाली शेतामधी दाटी...

निसर्गदत्त प्रतिभा असलेल्या आणि रोजच्या जगण्यातल्या गोष्टी अत्यंत सुंदर शब्दांमध्ये गुंफणाऱ्या कवयित्री म्हणजे बहिणाबाई. ‘कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कवितामध्ये आज पाहू या बहिणाबाईंचीच एक  छान कविता.
...........
धरत्रीच्या कुशीमधी
बियबियानं निजली,
वऱ्हे पसरली माटी
जशी शाल पांघरली

बीय टरारे भुईत
सर्वे कोंब आले वऱ्हे,
गह्यरलं शेत जसं
आंगावरती शहारे

ऊन वाऱ्याशी खेयता
एका एका कोंबातून,
पर्गटले दोन पानं
जसे हात जोडीसन

टाया वाजवती पानं
दंग देवाच्या भजनी,
जसे करती कारोन्या
होऊ दे रे आबादानी

दिसामासा व्हये वाढ
रोपं झाली आता मोठी,
आला पिकाले बहार
झाली शेतामधी दाटी

कसे वाऱ्यानं डोलती
दाने आले गाडी गाडी
दैव गेलं रे उघडी
देव अजब गारोडी!

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
avadhut patil About 235 Days ago
nice #1
0
0
Pawse uttreshwar About 307 Days ago
K
1
0

Select Language
Share Link
 
Search