Next
बेल्जियमने जिंकला ‘किंडर+स्पोर्ट्स फेयर प्ले’ पुरस्कार
प्रेस रिलीज
Saturday, April 28, 2018 | 03:21 PM
15 0 0
Share this story

पुणे : बालेवाडी क्रीडांगण येथे २० ते २४ एप्रिल या दरम्यान भरवण्यात आलेल्या इंटरनॅशनल स्कूल स्पोर्टस फेडरेशन्सच्या वर्ल्ड स्कूल्स चॅँपियनशीप बॅडमिंटन स्पर्धेमध्ये उत्कृष्ट दर्जाचा खेळ पाहाण्यात आला. या कोर्टावर झालेला खेळ या महिन्याच्या सुरुवातीलाच झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या तोडीचा होता.

बेल्जियमच्या खेळाडूंनी कोर्टावर दाखवलेल्या उच्च दर्जाची खिलाडू वृत्तीने त्यांना आयएसएफ वर्ल्ड स्कूल्स चॅंपियनशीप बॅडमिंटन स्पर्धेच्या यंदाच्या आवृत्तीमध्ये फेयर प्ले चषक मिळवून दिला.

या स्पर्धेमध्ये १५ देशांतील ३०० मुले व मुली आपापल्या देशाचे प्रतिनिधीत्व करत सहभागी झाली होती. पाच दिवसांच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या विभागांत एकूण ६९० सामने खेळण्यात आले. ही स्पर्धा प्रेक्षणीय ठरली. सांगता समारंभ ‘आयएसएफ’चे क्रीडा संचालक नॉबर्ट केव्हर, फेरेरो इंडियाचे सेक्रेटरी जनरल इंदर चोप्रा, आणि ‘एसजीएफआय’चे संचालक गौरव दीक्षित यांसह इतर मान्यवर उपस्थित होते. 

या प्रसंगी ‘फेरेरो इंडिया’चे चोप्रा म्हणाले, ‘जागतिक पातळीवर बेल्जियमने दाखवलेली गुणवत्ता, निश्चयी आणि सच्ची खिलाडू वृत्ती यांबद्दल त्यांना किंडर+स्पोर्ट्स फेयर प्ले चषक प्रदान करताना आम्हाला आनंद होत आहे. ‘आयएसएफ’प्रमाणेच ‘किंडर+स्पोर्ट्स’देखील खेळाद्वारे शिक्षण, निरोगी जीवनशैली आणि लिंग समानता या मूल्यांवर अधिष्ठित आहे.’

‘क्रीडा क्षेत्रातील तरुण गुणवत्तेला प्रोत्साहन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. तरुण बॅडमिंटन खेळाडूंना ‘जॉय ऑफ मूव्हिंग’चा आनंद देणे हे किंडर+स्पोर्ट्स सीएसआर उपक्रमाचे ध्येय आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणारे मान्यवर, सहभागी खेळाडू आणि मदतनीस कर्मचारी वर्ग यांचे आम्ही आभार मानतो,’ असे चोप्रा यांनी नमूद केले.

स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाचे संचालक दीक्षित म्हणाले, ‘स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाने पुणे, भारतात वर्ल्ड स्कूल चॅंपियनशीप बॅडमिंटनचे आयोजन केले. खेलो इंडिया-स्कूल गेम्सचे यशस्वी आयोजन केल्यानंतर आम्ही या वर्षी आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांचे आयोजन केले. पहिल्यांदाच भारतात बॅडमिंटन वर्ल्ड स्कूल चॅंपियनशीपचे आयोजन करण्यात आले होते. हा एक असामान्य अनुभव आणि यशस्वी कार्यक्रम ठरला.’  

‘किंडर+स्पोर्ट्स’बद्दल :
किंडर+स्पोर्ट्स फेरेरोने विकसित केलेला जागतिक उपक्रम असून तरुण पिढीमध्ये शारीरिक सक्रियतेचा प्रचार करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. हा उपक्रम फेरेरोच्या सामाजिक जबाबदारी उपक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे.

लहान मुलांना खेळण्यास उद्युक्त करून त्यांच्यात व त्यांच्या कुटुंबात सक्रिय जीवनशैला प्रचार करणे व शारीरिक सक्रियता हा दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे या या उपक्रमाचा हेतू आहे. जगभरातील मुलांना सक्रिय बनवण्यात आघाडीचे स्थान मिळवणे हे फेरेरो समुहाचे ध्येय आहे. २००५ मध्ये स्थापन झालेले किंडर+स्पोर्ट्स सध्या २८ देशांत कार्यरत असून, दरवर्षी ४.४ दशलक्ष मुलांना सक्रिय करते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link