Next
इनामदार महाविद्यालयातर्फे आंतरराष्ट्रीय वाणिज्य परिषद
प्रेस रिलीज
Wednesday, January 16, 2019 | 04:53 PM
15 0 0
Share this article:

पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन (एमसीई) सोसायटीच्या आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयातर्फे ‘व्हिजन इंडिया २०३०’ या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय वाणिज्य परिषदेचे आयोजन पुण्यात करण्यात आले असून, राज्याच्या उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने यांच्या हस्ते १८ जानेवारी २०१९ रोजी सकाळी १० वाजता या परिषदेचे उद्घाटन होणार आहे.

प्राचार्य आणि वाणिज्य परिषद अध्यक्ष डॉ. शैला बूटवाला आणि वाणिज्य परिषद सचिव डॉ. एम. जी. मुल्ला यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. ‘एमसीई’ सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार हे उद्घाटन समारंभाला अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. आझम कॅंपसमधील असेम्ब्ली हॉल येथे ही परिषद होणार आहे. केंद्रीय विद्यापीठ आयोगाचे अध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन हे परिषदेच्या समारोप कार्य्रक्रमाला १९ जानेवारीला सकाळी १० वाजता उपस्थित राहणार आहेत.

या परिषदेला आंतरराष्ट्रीय पातळीवरील सहा विद्यापीठांतून १२० तज्ज्ञ, संशोधक, प्राध्यापक उपस्थित राहणार असून, ६५ शोधनिबंध सादर केले जाणार आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search