Next
‘डीकेटीई’च्या विद्यार्थ्यांची ‘ट्रायडेंट’मध्ये प्रशिक्षणासाठी निवड
प्रेस रिलीज
Monday, May 06, 2019 | 03:29 PM
15 0 0
Share this article:

प्रशिक्षणासाठी निवड झालेले विद्यार्थी

इचलकरंजी : येथील डीकेटीई संस्थेतील टेक्स्टाइल विभागात तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या आठ विद्यार्थ्यांची ‘ट्रायडेंट’ या आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहून ‘ट्रायडेंट’कडून दोन महिन्यांच्या प्रशिक्षणाबरोबर रुपये एक लाख इतके विद्यावेतनही देणार आहे. 

‘ट्रायडेंट’ या कंपनीमार्फत टेरी टॉवेल व शिटिंग फॅब्रिक उत्पादन करते. या कंपनीने नुकतीच ‘डीकेटीई’स भेट दिली व ६० विद्यार्थ्यांना ऑनलाइन टेस्टसाठी शॉर्टलिस्ट केले होते. यामधून १२ विद्यार्थ्यांची सायकोमेट्रीक टेस्टसाठी निवड केली. त्यानंतर टेक्निकल व ‘एचआर’नी मुलाखात घेऊन बीटेक टेक्स्टाइल तृतीय वर्षातील जीनेश ललवानी, पनप सालेचा, विश्‍वजीत सांगवे, रोहन खराडे, श्रेयांश रांका, तेजस्वीनी पसारे, सुरज कोठारी व शंतनू साठे या विद्यार्थ्यांची निवड केली आहे.  

उत्तम कौशल्य व ज्ञान अवगत असणारा इंजिनीयअर ही या काळाची गरज आहे. वस्त्रोद्योग अभियंत्यांना ज्या उद्योगजगतात काम करायचे आहे, त्याची ओळख व्हावी व मुलाखात देत असताना त्यांचा आत्मविश्‍वास वाढावा यासाठी विद्यार्थ्यांना दरवर्षी दोन महिने या कालावधीसाठी देश व विदेशांतील विविध उद्योगजगतात ट्रेनिंगसाठी पाठवले जाते. ‘ट्रायडेंट’मध्ये ‘डीकेटीई’चे विद्यार्थी संशोधक प्रकल्पावर काम करणार असून, कंपनीतर्फे विविध विभागातील तज्ज्ञ या विद्यार्थ्यांना या काळात मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय प्रशिक्षण कालावधीत विद्यार्थ्यांचे कार्यक्षमता व त्यांच्यातील संशोधन वृत्तीची पडताळणी करुण त्यांना थेट नोकरीसाठी घेण्याचे संकेत दिले आहेत.

श्रेयांश रांकाया ट्रेनिंगचा फायदा भविष्यकाळात प्लेसमेंटसाठी होणार असून, ‘डीकेटीई’ने विद्यार्थ्यांना चांगल्या कंपनीत ट्रेनिंग व नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साही वातावरण असल्याची प्रतिक्रिया श्रेयांश रांका या तृतीय वर्ष मॅनमेड टेक्स्टाइल टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्याने व्यक्त केली.    

या प्रशिक्षण निवडीसाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. एस. बी. अकीवाटे यांचा अनमोल वाटा आहे. या विद्यार्थ्यांना इन्स्टिट्यूटचे प्राचार्य प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, टेक्स्टाइल विभागप्रमुख प्रा. डॉ. यू. जे. पाटील, डॉ एम. वाय. गुडीयावर यांच्यासह सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन मिळाले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search