Next
सॉफ्टबॉल स्पर्धेत इंग्लिश मीडियम स्कूलला जेतेपद
प्रेस रिलीज
Friday, September 28 | 10:25 AM
15 0 0
Share this story



पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय आंतरशालेय सॉफ्टबॉल स्पर्धेत विजेतेपद पटकावले.

१४ वर्षे वयोगटातील या स्पर्धेचा अंतिम सामना एमसीई सोसायटी इंग्लिश मीडियम स्कूल आणि पीईएस इंग्लिश मीडियम स्कूल यांच्यात रंगला. एमसीई सोसायटी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ९-१ने लढत जिंकली. ही स्पर्धा पुणे जिल्हा क्रीडा परिषद व पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे आयोजित करण्यात आली होती. आझम कॅँपस मैदानावर दिनांक २६ सप्टेंबरला स्पर्धा पार पडली.

पीईएस इंग्लिश मीडियम स्कूल उपविजेतेपद, तर महेश विद्यालय माध्यमिक शाळेला तृतीय क्रमांक मिळाले. हुजेफा सय्यद, फुरकान खान यांना उत्कृष्ठ खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले. एमसीई सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, आझम स्पोर्टस अॅकॅडमीचे संचालक गुलजार शेख, शाळेच्या मुख्याध्यापक रबाब खान यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link