Next
‘डीकेटीई’मध्ये कार्यशाळा उत्साहात
प्रेस रिलीज
Monday, July 01, 2019 | 05:29 PM
15 0 0
Share this article:

‘डीकेटीई’मध्ये आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना मोहन सातपुते.

इचलकरंजी : इन्स्टिट्यूटशन ऑफ इंजिनीअर्स कोल्हापूर लोकल सेंटर व ‘डीकेटीई’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डीकेटीई’मध्ये ‘सिव्हिल इंजिनीअरिंग क्षेत्रातील सरकारी व खासगी क्षेत्रात उपलब्ध असलेल्या सुवर्णसंधी’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. 

यात बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया इचलकरंजीचे अध्यक्ष मोहन सातपुते, असोसिएशन ऑफ इंजिनीअर्स अँड आर्किटेक्टस् इचलकरंजीचे अध्यक्ष रियाज सत्ती, क्रेडाई इचलकरंजीचे राजेंद्र खंडेराजुरे, असोसिएशन ऑफ व्हॅल्युअर्स कोल्हापूरचे संदीप टारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.  

सध्या या बांधकाम क्षेत्रात अत्यंत प्रगती होत असल्याने सिव्हिल इंजिनीअरिंगचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. झपाट्याने वाढणाऱ्या बांधकाम क्षेत्रालस भविष्यार भरपूर सिव्हिल इंजिनीअर्सची गरज भासणार आहे. या क्षेत्रात येणाऱ्या या विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल असल्याचे सर्व मान्यवरांनी सांगितले. या शिवाय येणाऱ्या काही वर्षांत सरकारी व निमसरकारी क्षेत्रात भरपूर संधी निर्माण होतील, असा विश्‍वास या वेळी व्यक्त करण्यात आला. 

कार्यशाळेला उपस्थित विद्यार्थी.

‘डीकेटीई’चा सिव्हिल इंजिनीअरिंग विभाग विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण देत असल्याने येथील विद्यार्थी बांधकाम क्षेत्रात आपली स्वतःची ओळख निर्माण करण्यास समर्थ ठरतील, असा विश्‍वासही तज्ज्ञांनी व्यक्त केला. या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक अशा ‘सिव्हिल इंजिनीअरिंग स्टुडंट असोसिएशन’चे उद्घाटनही करण्यात आले.  

या वेळी सिव्हिल इंजिनीअरिंग विभागप्रमुख प्रा. डॉ. एम. बी. चौगुले यांनी प्रास्ताविकात सेमिनारचे महत्त्व विशद केले. ‘डीकेटीई’चे संचालक प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, उपसंचालक प्रा. डॉ. यू. जे. पाटील आणि उपसंचालिका डॉ. एल. एस. आडमुठे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यशाळेचे समन्वयक म्हणून प्रा. क्षितिजा बलवान यांनी काम पाहिले. या वेळी प्रा. व्ही. डी. साखरे, प्रा. ए. एल. मुल्ला, विद्यार्थी प्रतिनिधी करण यलरुते, शार्दुल पाटील व इतर विद्यार्थी उपस्थित होते. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search