Next
‘डिओलिओ’ची भारतीय केंद्रीय वितरण यंत्रणेत नाविन्यता
प्रेस रिलीज
Thursday, May 03, 2018 | 03:49 PM
15 0 0
Share this article:

नवी दिल्ली : स्पॅनिश बहुराष्ट्रीय डिओलिओ या जगातील ऑलिव्ह तेल उत्पादनाच्या विक्रीमधील अव्वल कंपनीने भारतातील त्यांच्या केंद्रीय वितरण यंत्रणांमध्ये नाविन्यता आणण्याच्या योजनांची घोषणा केली. या नवीन योजना डिओलिओ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत असलेल्या भारतातील फिगारो व बेर्तोली या त्यांच्या दोन मुख्य ब्रॅंड्सच्या उत्पादन, वितरण व विपणनाच्या सर्व पैलूंची हाताळणी करतील.

डिओलिओ येथील मुख्य व्यावसायिक अधिकारी मिग्युल डी जैमे गुजेरो म्हणाले, ‘हा नवीन व्यवसाय विभाग भेट बाजारपेठेमध्ये माल आयात करण्यामध्ये आम्हाला मदत करेल आणि एकाच ठिकाणामधील आमचे भागीदार व राष्ट्रीय वितरण माध्यमांसोबतचे संबंध वाढवण्यामध्ये मदत करेल. भारत ही आमच्या व्यवसायासाठी प्रमुख बाजारपेठ आहे आणि म्हणूनच कंपनी येथे महत्त्वपूर्ण गुंतवणूक करत आहे. ग्राहकांच्या खाद्यपदार्थ व आरोग्यदायी जीवनशैलीच्या संदर्भात गरजांचा विचार करता नेहमी सकारात्मक विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मध्यमवर्गीय कुटुंबांची वाढती संख्या, अतिप्रमाणात होणारा खर्च आणि वाढलेला खर्च यामधून ही गरज दिसून येते,’

ते पुढे म्हणाले, ‘आम्ही आता उत्पादनासह वितरण व विपणन, १४०हून अधिक लोकांना रोजगार, चार नवीन ठिकाणी कोठारांचे निर्माण आणि थेट आयातींच्या माध्यमातून बाजारपेठेसोबतचा व्यवहार वाढवणे अशा देशातील विविध व्यवसाय कार्यसंचालनांच्या सर्व पैलूंची हाताळणी करू. आम्ही भारतातील आमच्या वाढत्या ग्राहकवर्गाला आमच्या स्पॅनिश वारशामधील उत्पादने ऑफर करण्यासाठी मागण्यांची पूर्तता करणारा आमचा व्यवसाय वाढवण्यासाठी उत्सुक आहोत.’

‘सध्या भारतातील एक्स्ट्रॉ व्हर्जिन, व्हर्जिन व शुद्ध ऑलिव्ह तेल विभागांमध्ये डिओलिओचा २२ टक्के बाजारपेठ हिस्सा आहे आणि फिगारो हे भारतीय बाजारपेठेमध्ये आयात करण्यात आलेले पहिले ऑलिव्ह तेल आहे. ऑगस्ट २०१३मध्ये डिओलिओने भारतीय बाजारपेठेमधील आपल्या कार्यसंचालनांची सुरुवात केली. कंपनीने अथक मेहनत घेत आपल्या वितरण माध्यमांमध्ये बदल घडवून आणले आहेत. ही नवीन घोषणा व्यवसायाच्या धोरणात्मक दिशेने वाटचालीला, तसेच आधुनिक व्यापार माध्यमामधील विकासासाठी नियोजित योजनांना सादर करते. भारतातील जीडीपी वाढ २०१७मधील ६.५टक्क्यांवरून २०१८-१९मध्ये ७टक्क्यांपर्यत पोहोचेल असा अंदाज आहे,’ असे त्यांनी सांगितले.

डिओलिओ इंडियाच्या महाव्यवस्थापिका सुसान तोरिबिओ बस्टेलो म्हणाल्या, ‘आम्ही भारतातील आमच्या व्यवसाय कार्यसंचालनांचे सामर्थ्य आणि वर्षानुवर्षे केलेला सातत्यपूर्ण विकास दाखवला आहे. कार्यसंचालनांमधील ही वाढ आणि गुंतवणूक पुरवठा व वितरण साखळीमध्ये अधिक प्रभावीपणे व उत्तमपणे बदल घडवून आणतील.

ग्राहकांना उच्च दर्जाची उत्पादने देण्याच्या उद्देशासह कंपनी शेतकर्‍यांकडून कच्च्या मालाच्या खरेदीपासून उपखंडातील ग्राहकांपर्यंत अंतिम उत्पादन पोहोचण्यापर्यंत सर्व प्रक्रियांवर बारकाईने लक्ष ठेवते. २०१८मध्ये आतापर्यंत डिओलिओ ऑलिव्ह ऑईल ब्रॅंडने जगभरात ३२ पुरस्कार जिंकले आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search